पॅरिस : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांचे शौर्य भारतासह जगातील भावी पिढींना प्रेरणा देत राहील, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या दौर्यात मार्सेल येथे भेट देऊन सावरकरांना आदरांजली वाहिली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मार्सेल शहराच्या योगदानाची आठवण करून देणार्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये मोदी यांनी म्हटले की, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मार्सेलच्या नागरिकांचे विशेष स्थान आहे.
या शहरात वीर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मार्सेलच्या नागरिकांनी व आंदोलकांनी सावरकर यांना ब्रिटिशांच्या ताब्यात देऊ नये, अशी भूमिका घेतली होती. यामुळे मी येथील जनतेचे आभार मानतो. वीर सावरकर यांचा लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत असल्याचे देखील मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी मार्सेल शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली वाहिली व भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील या शहराच्या इतिहासाच्या आठवणींना उजाळा दिला. पोहोचल्यानंतर भारतीय वंशाच्या नागरिकांनी केलेल्या स्वागताने भारावून गेल्याचे मोदी यांनी म्हटले.
पोस्टमध्ये मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटले की, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि मी मार्सेलला पोहोचलो. तिथे भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभूतपूर्व स्वागत केले. यावेळी भारताच्या नवीन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करण्यात आले. भारत आणि फ्रान्सचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी या योगदान राहणार आहे. पहिल्या आणि दुसर्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. हे शहर वीर सावरकरांच्या शौर्याची साक्ष देणारे आहे.
काय आहे शहराचा इतिहास ?
वीर सावरकर यांचा मार्सेलशी संबंध १९१० पासूनचा आहे. त्यांना लंडनमध्ये अटक केल्यावर राजकीय कैदी म्हणून भारतात आणले जात होते. तेव्हा काही त्यांना फ्रान्सच्या मार्सेल शहरात आणले. ८ जुलै १९१० रोजी ब्रिटिशांचे जहाज मार्सेल बंदरातून रवाना होताना सावरकर यांनी समुद्रात उडी घेत इंग्रजांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश येण्याआधीच फ्रेंच अधिकार्यांना त्यांना पकडून दिले. त्यावेळी येथील नागरिकांनी सावरकर यांनी इंग्रजांकडे सोपविण्यास विरोध केला होता. ब्रिटिश राजवट उलथवण्याचा त्यांच्यावर आरोप फ्रान्समध्ये आश्रय मिळेल या आशेने त्यांनी समुद्रात उडी घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.