SBI च्या ग्राहकांना मोठा झटका; 1 एप्रिलपासून ‘या’ कामांसाठी मोजावे लागतील जास्त पैसे

SBI च्या करोडो ग्राहकांना पुढील आठवड्यापासून मोठा झटका बसणार आहे. वास्तवि SBI बँकेने त्यांच्या विविध डेबिट कार्डांसाठी वार्षिक देखभाल शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे, जी पुढील आठवड्यापासून लागू होणार आहे.

१ एप्रिलपासून बदल लागू होणार 
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, विविध डेबिट कार्डच्या बाबतीत वार्षिक देखभाल शुल्क 75 रुपयांपर्यंत वाढवले ​​जात आहे. डेबिट कार्डचे नवीन वार्षिक देखभाल शुल्क 1 एप्रिल 2024 पासून लागू होईल. देशातील करोडो लोक एसबीआय डेबिट कार्ड वापरतात. ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीतही SBI ही देशातील सर्वात मोठी बँक आहे.

अशा प्रकारे शुल्क वाढले
SBI क्लासिक, सिल्व्हर, ग्लोबल, कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्डच्या बाबतीत, आता ग्राहकांना देखभाल शुल्क म्हणून 200 रुपये अधिक GST भरावा लागेल. सध्या हे शुल्क 125 रुपये अधिक जीएसटी आहे. तसेच युवा, गोल्ड, कॉम्बो डेबिट कार्ड, माय कार्ड (इमेज कार्ड) च्या बाबतीत 175 रुपयांऐवजी 250 रुपये आकारले जातील. SBI प्लॅटिनम डेबिट कार्डवर आता 250 ऐवजी 325 रुपये आकारले जातील. प्राइड आणि प्रीमियम बिझनेस डेबिट कार्डसाठी वार्षिक देखभाल शुल्क आता 350 रुपयांवरून 425 रुपयांपर्यंत वाढणार आहे. सर्व शुल्कांवर स्वतंत्र जीएसटी लागू आहे.