SBI: बँकेत नोकरीची तयारी करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. SBI च्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. SBI PO Recruitment 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2023 आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. SBI PO Bharti 2023
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
वयाची अट: या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2023 रोजी 21 ते 30 वर्षे असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2023