पाचोरा : तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील रहिवासी गणेश वना कोळी यांच्या घराला मध्यरात्री आग लागली. या आगीत त्यांचे अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू साहित्य पूर्णपणे जळून गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यात त्यांच्या दहावीत शिक्षण घेत असलेली मुलगी व आठवी शिक्षण घेत मुलाचे शालेय साहित्य देखील जळून खाक झाले. या मुलांचे शालेय साहित्य जळाल्याने त्यांचे शैक्षिणक नुकसान होऊ नये याकरिता तहसीलदारांनी पुढाकार घेत या दोघा मुलांना तात्काळ स्वखर्चाने शालेय साहित्य वाटप केले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटनेतील कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांचा जीवन उदरनिर्वाह हा रोजंदारीवर चालू आहे. तहसीलदार विजय बनसोडे यांनी त्या कुटुंबीयांच्या दोघे मुलांना शाळेचा गणवेश व शालेय साहित्य बॅग पुस्तक वगैरे आदी तात्काळ मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला.
पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे ही सर्वसामान्य परिस्थितीतूनच पुढे आले असल्याने त्यांनी या घटनेमुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून स्वतः त्या मुलाला व त्या मुलीला साहित्य वितरित केले. तसेच अजून इतर काही सुविधा पुरवता येईल का? याचीही चौकशी केली तसेच त्यांचे घरकुल यादीमध्ये नाव असून त्यांना घरकुल मिळावे या बाबत शिफारस करणार आहे. लवकरात लवकर त्यांना आर्थिक मदत मिळून देण्यात येईल असे तहसीलदार पाचोरा यांनी सांगितले. घटनास्थळी तहसीलदार विजय बनसोडे तलाठी दीपक दवंगे तलाठी पल्लवी वाघ कोतवाल कुंभार ग्रामस्थ व पोलीस पाटील इत्यादी उपस्थित होते.