---Advertisement---

Nagpur Crime News: संतापजनक! नराधमाकडून दोन तासांत १७ शाळकरी मुलींचा विनयभंग

by team
---Advertisement---

नागपूरमध्ये अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शाळेजवळ घडलेल्या अत्यंत धक्कादायक घटनेत, एका इसमाने तब्बल १७ शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी रवि लाखे (वय ३२) याला पोलिसांनी तातडीने अटक केली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

काय आहे प्रकरण?

नागपूरच्या नंदनवन परिसरातील एका नामांकित शाळेजवळ ही घटना घडली. शाळेजवळच असलेल्या स्टेशनरी दुकानाचे शटर नादुरुस्त झाले होते, त्यामुळे दुकानदाराने शटर दुरुस्त करण्यासाठी रवि लाखे याला बोलावले होते. शनिवारी दुपारी तो दुकानाचे काम करण्यासाठी आला. मात्र, त्याने काम सोडून शाळेच्या गेटजवळ थांबून मुलींना विचित्र नजरेने पाहणे सुरू केले.

हेही वाचा : Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी, जाणून घ्या काय आहे?

परिसरातील एका पालकाने हे पाहून त्याला जाब विचारला. त्यानंतर तो दुकानात परतला, पण त्याची विकृत मानसिकता तिथेच थांबली नाही. दुकान उघडे असल्याचा फायदा घेत तो दुकानात आलेल्या शाळकरी मुलींना आत बोलवू लागला.

चॉकलेट-बिस्किटचे आमिष देत अश्लील चाळे

दुकानात काही मुली स्टेशनरी खरेदीसाठी आल्या असता, मूळ दुकानदार तिथे नव्हता. ही संधी साधत आरोपी लाखेने मुलींना चॉकलेट आणि बिस्किटांचे आमिष दाखवून आत बोलावले. आत आल्या की तो त्यांना अश्लील पद्धतीने स्पर्श करीत होता आणि गैरवर्तन करीत होता.

या घटनेत जवळपास दोन तासांत १७ शाळकरी मुली आरोपीच्या जाळ्यात सापडल्या. काही मुलींनी घाबरून पळ काढला, तर काहींना या प्रकारामुळे मोठा मानसिक धक्का बसला.

दोन मुलींच्या धाडसामुळे आरोपी गजाआड

या प्रकरणातील दोन मुलींनी हिंमत दाखवत घडलेला प्रकार शाळेत आलेल्या त्यांच्या पालकांना सांगितला. पालकांनी हे ऐकताच तातडीने नंदनवन पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपी रवि लाखे याला अटक केली. त्याच्याविरोधात पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment