---Advertisement---
भुसावळ: मध्य रेल्वेने शून्य भंगार मोहिम अंतर्गत एप्रिल ते ऑगस्ट 2023 दरम्यान भंगार विक्रीतून तब्बल 150.81 टक्क्यांची घसघशीत कमाई केली आहे. प्रमाणबद्ध विक्री लक्ष्यापेक्षा भंगार विक्रीची ही सर्वाधिक टक्केवारी आहे. सहा हजार 86 मेट्रिक टन रूळ, 9 लोकोमोटिव्ह, 160 कोच आणि 61 वॅगन्स (भुसावळ विभागातील 12 किलोमीटर अंतराच्या जामनेर-पाचोरा सेक्शन नॅरो गेज लाईनसह) विक्रीच्या माध्यमातून ही रक्कम मध्य रेल्वेला प्राप्त झाली आहे.
https://youtu.be/b3tRI041zq8
या विभागातून भंगार विक्रीतून लाभलेली कमाई अशी-
माटुंगा डेपोन 27.12 कोटींची भंगार विक्री केली तर मुंबई विभागाने 25.97, भुसावळ विभागाने 22.25 कोटी, पुणे विभागाने रु.16.08 कोटी, भुसावळच्या इलेक्ट्रिक लोको शेड डेपोने 16.05 कोटी, सोलापूर विभागाने 11.36 कोटी रुपये, नागपूर विभागाने 10.07 कोटी तर मध्य रेल्वेवरील इतर ठिकाणांनी एकत्रीतपणे 21.91 कोटी रुपयांची भंगार विक्री केली. झिरो स्क्रॅप मिशन अंतर्गत सर्व विभाग आणि डेपोंना भंगारमुक्त दर्जा मिळवून देण्यासाठी मध्य रेल्वे आपल्या वचनबद्धतेवर ठाम असून रेल्वे बोर्डाचे 2023-24 वर्षासाठी 300 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ओलांडण्यात आल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.शिवराज मानसपूरे यांनी कळवले आहे.
सुरक्षित रेल्वे प्रवासाला प्राधान्य: उद्दिष्टपूर्तीपेक्षा 37 टक्के वाढ
nरेल्वे गाड्यांना जोडणाऱ्या रेल्वे बोगींचे साधारण आयुष्य हे 25 वर्ष निर्धारीत करण्यात आले आहे. प्रत्येक गाडीला जोडण्यात येणारी बोगी (डबे) जोडण्यापूर्वी त्याची तपशीलवार तपासणी केली जाते शिवाय जे डबे चालवण्यास सुरक्षित आहेत त्यांनाच रेल्वे गाड्यांना जोडण्याची परवानगी दिली जाते. रेल्वेचा प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड विहित वेळेत भंगार साहित्यापासून पूर्णपणे मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी मध्य रेल्वेने झिरो-स्क्रॅप मिशन सुरू केले आहे. मध्य रेल्वेने या कामाला प्राधान्य देऊन, कालबाह्य (ओव्हरेज्ड) लोको,
डिझेल सरप्लस लोको, अ-ऑपरेशनल रेल्वे लाईन्स आणि जुनाट किंवा अपघाती लोको/कोच यासह विविध प्रकारचे भंगार निवडण्यासाठी आणि विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने 31 ऑगस्टपर्यंत 150.81 कोटी रुपयांची भंगार विक्री करण्यात आली असून रेल्वे बोर्डाच्या प्रो-रेटा उद्दिष्टाच्या तुलनेत ऑगस्ट 2023 पर्यंत 37.10 टक्के उल्लेखनीय वाढ झाली आहे.