Surupsingh Naik Passaway : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे निधन

---Advertisement---

 

Surupsingh Naik Passaway : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे आज (दि. २४ डिसेंबर) निधन झाले. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी नवापूर येथे अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, त्यांच्या निधनाने नंदुरबार जिल्हयात शोककळा पसरली आहे.

सुरुपसिंग नाईक यांची कारकीर्द

नवापूरच्या नवागाव येथे सुरुपसिंग नाईक यांचा १० सप्टेंबर १९३८ साली जन्म झाला. ते १९६२ मध्ये सुकवेल ग्रुपग्रामपंचायतीत सरपंच, १९६५ साली धुळे जिल्हा परिषदेत सदस्य, १९७२ साली नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, १९७७ साली नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार, १९८० साली मंत्री, २००९ पर्यंत नवापूर मतदारसंघाचे आमदार. या कालावधीत अनेक खात्यांचे मंत्रीपद त्यांनी भूषविले.

२००९ मध्ये शरद गावित यांनी त्यांचा पहिल्यांदा पराभव केला.त्यानंतर २०१४ मध्ये शरद गावित यांना पराभूत करत ते पुन्हा विधानसभेत पोहचले.

त्यांचे जुने सहकारी दिवंगत माणिकराव गावित यांच्याबरोबर त्यांनी आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून नवापूर तालुक्यात शिक्षण संस्थेचे जाऴे विणले.

तसेच अनेक विकास कामांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या पश्चात दोन पत्नी, दोन मुली, पाच मुलगे, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---