Stock market close: आठवड्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने खालच्या स्तरावरून चांगली रिकव्हरी दाखवली आहे आणि काल झालेली सर्व घसरण
जवळपास कव्हर झाल्याचं चित्र आहे. काल बँक निफ्टीने सुमारे 500-600 अंकांची घसरण दर्शवली, तर आज सुमारे 1000 अंकांच्या रिकव्हरीसह व्यवहार बंद झाला.
बीएसईचा सेन्सेक्स 694.39 अंकांच्या वाढीसह 79,476.63 वर बंद झाला. NSE चा निफ्टी 217.95 अंकांच्या उसळीसह 24,213.30 च्या पातळीवर बंद झाला.
सकाळी बाजार उघडल्यानंतर लगेचच बँक निफ्टी 51102 च्या पातळीवर दिसला. आज बाजारातील रिकव्हरीने त्याला जबरदस्त उलटसुलट वळण दिले आणि सुमारे हजार अंकांच्या उसळीसह 52,207 च्या पातळीवर बंद झाला.
सेन्सेक्स शेअर्सची स्थिती
BSE सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 21 समभाग वाढीसह बंद झाले तर 9 समभाग घसरणीसह बंद झाले. JSW स्टील 4.72 टक्क्यांनी वाढून बंद झाला तर टाटा स्टील 3.64 टक्क्यांनी वधारला. ॲक्सिस बँक 2.73 टक्के, एचडीएफसी बँक 2.56 टक्के आणि इंडसइंड बँक 2.49 टक्के वधारण्यात यशस्वी झाले. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआय 2.33 टक्क्यांनी वाढून बंद झाली.
BSE बाजार भांडवल
बीएसईचे बाजार भांडवल 444.77 लाख कोटी रुपयांवर बंद झाले. बीएसईवर 4058 शेअर्सचे व्यवहार झाले, त्यापैकी 2468 शेअर्सचे भाव वाढले आणि 1478 शेअर्स घसरणीसह बंद झाले. 112 समभाग कोणताही बदल न करता बंद झाले.