ओडिशातील कटक येथे भीषण रेल्वे अपघात झाला आहे. बेंगळुरू-कामाख्या एक्सप्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर ८ जण जखमी झाले आहेत. ही ट्रेन बेंगळुरूहून गुवाहाटीतील कामाख्या स्टेशनला जात होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
कटकमधील नेरगुंडी नेरगुंडी रेल्वे स्टेशनाच्या जवळ कामाख्या एक्स्प्रेसचा अपघात झाला आहे. रेल्वेचे आकरा डबे रूळावरून घसरले. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. आपघातस्थळी तातडीची वैद्यकीय मदत देखील पोहोचवण्यात आली आहे. या अपघाताचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी
बाधित प्रवाशांसाठी नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाइनची व्यवस्था केली आहे. तसेच रेल्वेने मदतीसाठी दोन हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत – ८४५५८८५९९९ (भुवनेश्वर) आणि ८९९११२४२३८ (कटक). अशी माहिती ईस्ट कोस्ट रेल्वेचे सीपीआरओ अशोक कुमार मिश्रा अशोक कुमार मिश्रा यांनी दिली आहे.