शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी सात अर्ज दाखल

---Advertisement---

 

शेंदुर्णी, जामनेर : शेंदुर्णी नगरपंचायतसाठी २ डिसेंबरला मतदान होणार असून त्या दृष्टीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे.

अंतिम अर्ज स्वीकारण्याची मुदत 17 नोव्हेंबर पर्यंत आहे. दि. 14 नोव्हेंबर रोजी विविध प्रभागातून सात उमेदवारी अर्ज दाखल झाले, सदर अर्ज फक्त भाजपकडून दाखल झाले आहेत. मात्र इतर पक्षाकडून अजूनही अर्ज दाखल झालेले नाही.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त आता दोनच दिवस बाकी आहेत. त्यामध्ये नगराध्यक्ष व प्रभाग नगरसेवकांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत मोठी झुंबड उठणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षातून कोणत्या प्रभागातून कोणता उमेदवार अर्ज दाखल करतो याची उत्सुकता मतदारांना लागलेली आहे.

दिनांक 14 नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल झालेल्या उमेदवारांची नावे , पक्ष व प्रभाग क्र.

1). अहिरे विलास ओंकार -पक्ष-भाजप प्रभाग क्रमांक 1
2). गुजर सविता राजेंद्र -पक्ष-भाजप प्रभाग क्रमांक 14
3). सूर्यवंशी युवराज कडोबा -पक्ष भाजप नगराध्यक्ष पदासाठी
4). सूर्यवंशी गायत्री युवराज- पक्ष भाजप प्रभाग क्रमांक 6
5). बारी निकिता अतुल -पक्ष भाजप प्रभाग क्रमांक 9
6). बारी अतुल प्रल्हाद -पक्ष भाजप प्रभाग क्रमांक 17
7). काझी जुबिया परवीन नजमोद्दीन- पक्ष भाजप प्रभाग क्रमांक 14 या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नानासाहेब आगळे यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---