---Advertisement---

Jalgaon News : कॉलेजला गेलेली तरुणी बेपत्ता; डॉक्टर, तरुणाला बेदम मारहाण

---Advertisement---

जळगाव : कॉलेजला जाते, असे सांगून घराबाहेर पडलेली २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाली. मित्रासोबत रेत्वे स्टेशन परिसरातून दुचाकीने येत असताना सहा जणांच्या टोळक्याने थांबवित हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण करून तरुणाला डोक्याला काहीतरी वस्तू मारून जखमी केले. आमच्या पेशंटवर तुम्ही लवकर उपचार करा, असे म्हणत संशयितांनी डॉक्टरला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तरुणाला बेदम मारहाण

जळगाव : मित्रासोबत रेत्वे स्टेशन परिसरातून दुचाकीने येत असताना सहा जणांच्या टोळक्याने थांबवित हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण करून तरुणाला डोक्याला काहीतरी वस्तू मारून जखमी केले. शुक्रवारी (७ मार्च) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ही घटना काट्या फाईल परिसरात घडली. राहुल अशोक शिंदे असे जखमी तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी तक्रारीनुसार सिद्ध निधाने, नीलेश हंसकरसोबत दोन ते तीन इसम (सर्व रा. गुरुनानकनगर) यांच्यावर शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी हे तपास करीत आहेत.

डॉक्टरांना धक्काबुक्की प्रकरणी सात जणांवर गुन्हा

जळगाव : आमच्या पेशंटवर तुम्ही लवकर उपचार करा, असे म्हणत संशयितांनी डॉक्टरला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. ही घटना शुक्रवारी (७ मार्च) मध्यरात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आपत्कालीन विभागात घडली. या प्रकरणी तक्रारीनुसार सात जणांवर गुन्हा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील (वय ३४) हे रुग्णांच्या उपचारावर लक्ष ठेवून होते. सचिन सुनील महाजन (रा. शिवाजीनगर) तसेच सोबतचे पाच ते सहा अनोळखी आपत्कालीन विभागात शिरले. आमच्या पेशंटवर लवकर औषधोपचार करा, असे डॉ. अमोल पाटील यांना म्हणत संशयितांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणला.
या प्रकरणी शनिवारी (८ मार्च) जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक उल्हास चन्हाटे हे तपास करीत आहे.

कॉलेजला गेलेली तरुणी बेपत्ता

जळगाव : कॉलेजला जाते, असे सांगून घराबाहेर पडलेली २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाली. मंगळवारी (४ मार्च) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. कुटुंबीयांनी सर्वत्र घेतला असता लागला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार मिसिंग शनिवारी (८ मार्च) दाखल करण्यात आली. हवालदार बापू पाटील तपास करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment