---Advertisement---

आईच्या समोरच बिबट्याने सात वर्षाच्या मुलाला उचलून नेलं, साकळी परिसरात खळबळ

by team
---Advertisement---

Yawal  : तालुक्यातील साकळी शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात काम करीत असलेल्या आईच्या जवळ खेळत असलेल्या सात वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. केश्या पेमा बारेला (रा. किनगाव, ता. यावल) असे मृत बालकाचे नाव आहे.

यावल तालुक्यातील किनगाव येथील शेतकरी केतन सुरेश चौधरी यांच्या साकळी, येथील शेतात कामास असलेले पेमा बुटसिंग बारेला यांचा मुलगा केश्या बारेला हा आईसोबत शेतात आला होता. काम आटोपून घरी निघत असताना बिबट्याने केश्यावर झडप घातली. बिबट्या केश्याला नेत असताना त्याच्या आईने बिबट्याच्या जबड्यातून मुलाला ओढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यावेळी बिबट्या केश्याला सोडून पळून गेला. मात्र गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

वनविभागाला घटनेची माहिती मिळताच यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, चोपडा सहायक वनरक्षक प्रथमेश हडपे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे, पोलिस पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मृतदेहाला यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. घटनास्थळी बिबट्याच्या पायांचे ठसे आढळले आहेत

या दुर्घटनेमुळे साखळी किनगाव परिसरासह संपूर्ण यावल तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासन आणि वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment