नवीन वर्ष सुरू झाले आहे. शेअर बाजाराबद्दल बोलायचे झाले तर मागील काही वर्षांचा इतिहास पाहत जानेवारी महिना गुंतवणूकदारांसाठी काही खास ठरलेला नाही. आकडेवारीनुसार, गेल्या दशकात जानेवारी महिन्यात निफ्टीत 7 वेळा घसरण झाली आहे. जानेवारी महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली शेअर बाजारातील विक्री हे त्याचे प्रमुख कारण आहे. आता जानेवारी 2025 मध्येही घसरण होईल कि गुंतवणूकदारांना फायदा होईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
सात वेळा जानेवारीमध्ये घसरण
गेल्या 10 वर्षांचा विचार केला तर जानेवारी महिन्यात बाजारात जोरदार विक्री दिसून आली आहे. या घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केलेली विक्री. 2015, 2017 आणि 2018 मध्ये जानेवारी महिन्यात निफ्टीमध्ये सकारात्मक परतावा दिसला. जानेवारी 2015 मध्ये 6.35 टक्के, 2017 मध्ये 4.59 टक्के आणि 2018 मध्ये 4.72 टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. तर सर्वाधिक घसरण 2016 मध्ये 4.82 टक्के 2021 मध्ये 2.48 टक्के, 2019, 2020, 2022, 2023 आणि 2024 या वर्षांमध्ये जानेवारी महिन्यात 0.03 ते 2.45 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
FII निव्वळ विक्रीवर
गेल्या तीन वर्षांत एफआयआयने जानेवारीमध्ये देशांतर्गत शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणात विक्री केली आहे . 2022 मध्ये 33,303 कोटी रुपयांच्या भारतीय इक्विटीची विक्री केली आणि त्यानंतर 2023 आणि 2024 मध्ये अनुक्रमे 28,852 कोटी आणि 25,744 कोटी रुपयांची विक्री केली. जानेवारी 2016, 2017 आणि 2019 मध्ये FII देखील निव्वळ विक्रेते होते. ज्यात अनुक्रमे 11,126 कोटी रुपये, 1,177 कोटी रुपये आणि 4,262 कोटी रुपये त्यांनी विक्रीद्वारे बाजारातून काढले आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी 2015, 2020 आणि 2021 मध्ये जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती ज्यात अनुक्रमे 12,919 कोटी, 12,123 कोटी आणि 19,473 कोटी रुपयांची गुंतवणूक होती.
DII ची खरेदी
दुसरीकडे, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) जानेवारीत सात वेळा निव्वळ खरेदीदार होते. DII ने जानेवारी 2023 मध्ये 33,412 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले, तर त्यांची पुढील सर्वात मोठी खरेदी 2024 मध्ये 26,744 कोटी रुपयांची होती. जानेवारी 2022 मध्ये, DII ने 21,928 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. 2016 ते 2019 अशी सलग चार वर्षे त्यांनी 12,875 कोटी ते 399 कोटी रुपयांच्या दरम्यान देशांतर्गत इक्विटी खरेदी केल्या. याउलट, DII 2015 मध्ये रु. 7,882 कोटी, 2020 मध्ये रु. 1,567 कोटी आणि 2021 मध्ये रु. 11,971 कोटी ची निव्वळ विक्री केली होती.
जानेवारी 2025 साठी तज्ज्ञांचा अंदाज ?
नुवामा अहवालानुसार, जर आपण गेल्या दशकातील हंगामी स्थिती पाहिल्यास, जानेवारी हा सहसा मंद महिना असतो, निफ्टी 70 टक्के लाला रंगात बंद झाला आहे .
मात्र, यावेळी जानेवारीत शक्यता 50-50 आहे. अहवालात असे म्हटले आहे की निफ्टी 24,350 अंक ओलांडण्यासाठी संघर्ष करेल आणि मजबूत FII सहभाग परत येईपर्यंत विक्री सुरूच राहील. दुसरीकडे,
2025 च्या आउटलुकवर, श्रीराम एएमसीचे वरिष्ठ फंड मॅनेजर दीपक रामराजू यांनी एका मीडिया रिपोर्टमध्ये आशा व्यक्त केली आहे की शेअर बाजार मजबूत आर्थिक वाढ आणि पायाभूत सुविधा आणि डिजिटल इनोव्हेशनला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी प्रयत्नांवर स्वार होईल.