Jalgaon Weather : जळगाव गारेगार, महाबळेश्वरपेक्षाही थंड, पारा १०.५ अंशांवर!

---Advertisement---

 

Jalgaon Weather : जळगाव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून थंडीची तीव्र लाट पसरली असून, रात्रीच्या तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. रविवारी जळगाव शहराचे तापमान १०.५ अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले होते. विशेष म्हणजे, सलग तीन दिवस जळगाव शहर राज्यातील सर्वात थंड शहर म्हणून नोंदवले गेले आहे. भारतीय हवामान खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती समोर आली आहे.

गेल्या चार दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तीव्र थंडीची लाट आली असून, रात्रीच्या तापमानामध्ये लक्षणीय घट झाली आहे. रविवारी, राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध झालेल्या महाबळेश्वरचे तापमान १३२ अंश सेल्सिअस असताना, जळगावचा पारा १०.५ अंश इतका खाली आला होता.

जळगावचा पारा, महाबळेश्वरपेक्षाही खाली रात्रीच्या आला आहे. गेल्या चार दिवसांत तापमानात तब्बल ११ अंशांची घट झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात रात्रीचा पारा ८ अंशांपर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे, तर आठवडाभरात तो ७ ते ८ अंशांपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे.

तापमानातील या अचानक बदलामुळे मानवी आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे. लहान मुलांना सर्दी-खोकल्याचा त्रास वाढला असून, ज्येष्ठांनाही थंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

दुसरीकडे, या थंडीमुळे रब्बी मिळण्याची शक्यता आहे, कारण जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पुढील काही दिवस वातावरण पूर्णपणे कोरडे राहणार असून, कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची शक्यता नसल्याने थंडीचा कडाका असाच कायम पिकांच्या लागवडीला चालना राहील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---