भटेश्वर वाणी
तरुण भारत लिव्ह न्युज जळगाव : शहरातून गिरणा नदीपात्रात लाखो लीटर वाहून जाणार्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते परत एकदा वापरात आणण्यासाठीच्या प्रक्रियेची सांडपाणी प्रक्रियेची योजना लवकरच कार्यान्वित करण्याचे काम जळगाव शहर महानगरपालिकेने हाती घेतले आहे. यामुळे या पाण्याचा परत एकदा वापर होऊ शकेल तर याच सांडपाण्यामुळे उद्भवणार्या वेगवेगळ्या आजारांपासून नगरिकांचा बचाव होणार आहे. यामुळे शहरातील रोगराई कमी करण्याच्या माध्यमातून आखण्यात आलेल्या या प्रकल्पाचे लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे याकडे जळगाव शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
जळगाव महानगरपालिकेतर्फे मलनिस्सारण योजनेच्या कामाला ऑक्टोबर २०१९ सुरुवात झाली. हे काम २४ महिन्यात पूर्ण करून ६ महिने प्रायोगिक तत्वावर चालविण्याचे काम करून, एकूणच ३० महिन्यात या कामाची समाप्ती करायची होती. पण कोरोनामुळे हा प्रकल्प पूर्णपणे बंद झाला. याकडे लोकप्रतिनिधींसह अधिकार्यांचे दुर्लक्ष झाल्याने या कामाला २०२३ चे वर्ष उजाडले. यात सुमारे ४७ कोटींचा निधी खर्चून प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.
९५ टक्के काम पूर्ण
या प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर ५ टक्के बाकी असलेल्या इलेक्ट्रिक कामासाठी हा प्रकल्प सुरू होण्यास ब्रेक लागला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात मागील सर्वेक्षणानुसार ५ ते ६ लाख नागरिकांचा रहिवास आहे. यातून निर्माण होणार्या ४२ लाख लीटर सांडपाण्यावर या केंद्रात दररोज प्रक्रिया होऊन हे पाणी शेती किंवा कंपन्यांच्या वापरात येईल अशी रचना आहे. हा प्रकल्प शिवाजी नगर भागातील जुन्या खत कारखान्यात असलेल्या जवळपास १० एकर जागेवर उभारण्यात येत आहे. या मलनिस्सारण योजनेचे काम पूर्ण झाले आहे. मात्र नियोजनाअभावी या प्रकल्पाची वीज जोडणी २०२२ या वर्षात होऊ शकली नाही. यासाठी महानगरपालिकेकडून वीज जोडणीसाठी निविदा प्रक्रिया राबवली गेली होती. या योजनेचा वीजपुरवठा सुरू झाला म्हणजे या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू होणार आहे. सुरवातीला ५० टक्के भागातील सांडपाण्यावर या प्रकल्पात प्रक्रिया होणार आहे.
त्यातूनच शहरात सुरू असलेले मलनिस्सारण योजनेचे अर्थात भुयारी गटार योजनेचे काम या वर्षात पूर्ण होणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये होणारे संसर्गजन्य आजाराचे प्रमाण कमी होणार आहे. यातूनच शहरातील गटारी उघड्या न रहाता भुयारी मार्गाने मलमिश्रित सांडपाणी प्रकल्पात जाणार आहे.
झाले आहे. मात्र नियोजनाअभावी या प्रकल्पाची वीज जोडणी २०२२ या वर्षात होऊ शकली नाही. यासाठी महानगरपालिकेकडून वीज जोडणीसाठी निविदा प्रक्रिया राबवली गेली होती. या योजनेचा वीजपुरवठा सुरू झाला म्हणजे या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू होणार आहे. सुरवातीला ५० टक्के भागातील सांडपाण्यावर या प्रकल्पात प्रक्रिया होणार आहे.