---Advertisement---

Nandurbar Crime : सोशल मीडियावर ओळख; फोटो व्हायरलची धमकी देत युवतीचे लैंगिक शोषण

---Advertisement---

नंदुरबार : अडीच वर्षापूर्वी सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत २१ वर्षीय युवतीला धमकावून तिचे लैंगिक शोषण करणाऱ्यासह तिला घर सोडून जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या नाशिक येथील एकाच्या विरोधात शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

युवतीचे अडीच वर्षापूर्वी नाशिक येथील एकाशी सोशल मीडियाद्वारे संपर्क झाला. कालांतराने त्यांच्यात मैत्री झाली व नियमित संपर्क सुरू झाला. यादरम्यानच्या कालावधीत त्या युवकाने युवतीला नंदुरबार व नाशिक येथे एका लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरोधात तिचे फोटो काढले व व्हिडीओ केला व ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तिचे लैंगिक शोषण केले. या अत्याचाराला कंटाळून त्या युवतीने घरी कोणालाही काहीही न सांगता २५ जुलै रोजी अचानक घर सोडले व बेपत्ता झाली.

शहादा पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक निलेश देसले यांनी घटनेच्या तपासाला गती दिली. ३१ जुलै रोजी युवतीला पंजाब पोलिसांच्या सहकार्याने पठाणकोट येथून ताब्यात घेऊन सुरक्षित शहाद्याला आणले. रात्री उशिरा शहाद्याला आल्यानंतर आपण घर का सोडले, याची माहिती दिली.

दरम्यान, नाशिक येथून तपासासाठी एकाला ताब्यात घेतले होते. युवतीच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसात संबधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश सूर्यवंशी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---