---Advertisement---

RBI Governer : शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ उद्या संपणार, कोण होणार नवे गव्हर्नर ?

---Advertisement---

RBI Governer : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर 2024 रोजी संपत आहे. त्यामुळे त्यांची कोण घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांच्या निवड होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाहीय.

कोण आहेत संजय मल्होत्रा ?
संजय मल्होत्रा हे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असून सध्या भारताचे महसूल सचिव आहेत. त्यांची कारकीर्द 33 वर्षांची आहे आणि त्यामध्ये त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

संजय मल्होत्रा यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर (IIT कानपूर) येथून अभियांत्रिकी पदवी घेतली आहे आणि नंतर प्रिन्सटन विद्यापीठातून सार्वजनिक धोरण विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

त्यांच्या कार्यकाळात, संजय मल्होत्रा यांनी वीज, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान आणि खाणकाम यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्य केले आहे. ते राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत.

त्यांनी राजस्थानमधील ऊर्जा विभागाचे प्रभारी प्रधान सचिव म्हणूनही काम केले असून, वित्तीय सेवा विभागात सचिवपदही भूषवले आहे.

दरम्यान, त्यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी निवड होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाहीय.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment