Shani Nakshatra Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रात नवग्रहांना विशेष महत्त्व आहे. त्यात शनीला खूप प्रभावशाली ग्रह मानले जाते. शनीला न्याय देवता देखील म्हटले जाते. कर्मफळदाता शनीने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला. राशी परिवर्तनासह शनीने नक्षत्र परिवर्तन देखील केलं आहे. शनीने 28 एप्रिल 2025 रोजी सकाळी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला होता. या नक्षत्रात शनीदेव येत्या 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत राहील. या दरम्यान शनी पद परिवर्तन करणार आहेत. या संक्रमणानुसार शनी 7 जून रोजी उत्तरा भाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात गोचर करेल. याचा स्वामी शनी आहे. शनीच्या या संक्रमणाचा काही राशींना विेशेष लाभ होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.
वृषभ रास
शनीचे हे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या एकादश भावात शनी विराजमान असणार आहे. या संक्रमणाच्या प्रभावाने तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. यासह तुम्हाला परदेशात काम करण्याची चांगली संधी देखील मिळू शकते. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. यासह तुम्हाला अनेक दिवासांपासून सुरु असलेला माणसिक ताणापासून देखील आराम मिळेल.
कन्या रास
शनीने 28 एप्रिल 2025 रोजी सकाळी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला होता. शनीचे हे गोचर तुमच्या राशीसाठी भाग्याचं ठरेल. तुमच्या राशीच्या सप्तम भावात शनी स्थित राहील. लव्ह लाईफच्या दृष्टीने हा काळ फार चांगला राहील. तसेच, प्रेम विवाहाचे अनेक योग जुळून येतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढत परदेशात व्यवसाय करण्याची संधी मिळेल.
तूळ रास
शनीची ही स्थिती तूळ राशीसाठी लाभदायक आहे. या काळात शनी उत्तरा भाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करुन सहाव्या चरणात प्रवेश करेल. त्यामुळे तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमची आर्थिकस्थिती मजबूत होईल. तसेच, शत्रूंवर तुम्हाला विजय मिळवता येईल. या काळात तुमच्या कुटुंबात सुख शांती नांदेल. तसेच मनातील इच्छा पूर्ण होतील.