शनी बदलणार रास, या राशींवर होणार शनीची कृपा..

 

तरुण भारत लाईव्ह।१५ जानेवारी २०२३। आपला प्रत्येक दिवस चांगला जावा हे प्रत्येकाला वाटत असत. पण येणारा  प्रत्येक दिवस चांगला असेलच असं नाही. प्रत्येकाला आपला प्रत्येक दिवस कसा जाईल याची उत्सुकता असते. चला तर मग आपण जाणून घेऊया हा आठवडा आपल्यासाठी कसा असेल.

मेष रास: सुरवातीस खर्च, नंतर लाभ 

हा आठवडा आपणास संमिश्र स्वरूपाचा जाण्याची शक्यता आहे. थोड्या खर्चिक घटनांनी सुरवात होणार असली तरी आठवड्याच्या मध्यात काही आर्थिक लाभ होऊन स्थिती सुधारेल.महत्वाची कामे वेग धरतील.सुख शांतीचे वातावरण निर्माण होईल.मित्रांचा पाठिंबा राहील.काहींना मात्र वारशाच्या मुद्द्यावरून भावन्डात वितुष्ट निर्माण होण्याचे अनुभव मिळू शकतात.व्यवसाय नोकरीत वातावरण काहीसे बिघडलेलेच राहील.१७ तारखेला महाग्रह शनीचे राश्यांतर होणार असून,तो आपणास सामान्यतः धनलाभकारक ठरणार आहे.

वृषभ रास: इच्छित कामे पूर्ण होतील 

या आवठवड्यात आपल्या आर्थिक आवक – जावकाचा ताळमेळ प्रयत्नपूर्वक जमवावा लागणार आहे. दैनंदिन खर्चाला अनेक वाटा फुटलेल्या असतील.शिवाय आर्थिक फसवणूक, अचानक मोठे खर्च कुटूंबात एखाद्याचे हॉस्पिटलायझशन करावे लागण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.आठवड्याच्या मध्यानंतर मात्र काहीसा दिलासा निश्चित मिळेल.नातेसंबंधात नवी ऊर्जा भरली जाईल.आरोग्य सुधारेल इच्छित कामे पूर्ण होतील. १७ तारखेला महाग्रह शनीचे राश्यांतर होणार असून,तो आपणास उपद्रवकारी ठरणार आहे.

मिथुन रास: संमिश्र योगांचा अनुभव यावा 

हा आठवडा आपणास संमिश्र स्वरूपाचा जाण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरवातीला सरकारी कामे, तसेच कोर्टाच्या कामात मोठे यश मिळू शकेल. मधल्या काळात पैशाला अनेक पाय फुटून खर्च वाढेल.काहींना प्रवासाचे योग्य येतील, मात्र शेवटी शेवटी आर्थिक स्थेर्य लाभेल.व्यवसायिक कामात ज्येठांचा सल्ला घेणे लाभदायक ठरेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी उदभवू शकतात. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता राहील. १७ तारखेला महाग्रह शनीचे राश्यांतर होणार असून,तो आपणास काहीसा काहीसा खर्च वृद्धीकारक ठरणार आहे.

कर्क रास: कार्यक्षेत्री दबदबा निर्माण व्हावा 

या आठवड्यातील ग्रहस्तिथी आपल्याला सुरवातीला अधिकच उत्साहवर्धक ठरावी. नोकरी व्यवसायातील रेंगाळलेल्या कामांना गती देता येईल. कार्यक्षेत्रात आपला दबदबा निर्माण होण्यास मदत होईल. कुटुंबातील, समाजातील दर्जा उंचावेल शेवटी मात्र काहींना शारीरिक, मानसिक अस्वस्थ निर्माण होण्याचे भय राहील. सावधगिरी म्हणून धावपळ टाळायला हवी आपली नियमित पथ्थे संभाळावीत.१७ तारखेला महाग्रह शनीचे राश्यांतर होणार असून,तो आपणास काहीसा त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

सिंह रास: भावनेच्या भरात चुका संभव 

या आठवड्यात लाभलेले ग्रहमान पाहता विरोधकांचा उपद्रव, कमालिची स्पर्धा हाताखालच्या सहकार्यापासून मनस्ताप असे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. भावनेच्या भरात काही निर्णय चुकण्याची शक्यता राहील. त्यामुळे सावध असावे. मध्यात काहींना प्रवास, भटकंती तीर्थाटन यासाठी उपयुक्त स्थिती राहील. कलावंत व साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व्हावा. संततीच्या उन्नतीचे योग्य यावेत. १७ तारखेला महाग्रह शनीचे राश्यांतर होणार असून,तो आपणास काहीसा चिंतावृद्धी करणारा ठरू शकतो.

कन्या रास : मनाचे संतुलन ढळू नये 

या आठवड्यात आपले काही आर्थिक व्यवहार वादाच्या भोवऱ्यात व संशयाच्या जाळ्यात सापडण्याची शक्यता आहे. महिला सहकाऱ्यांसोबत अत्यन्त सावधगिरीचा धोरण बाळगावयास हवे. महिलांनी पुरुष शकार्यापासून जरा सावधच रहावयास हवे. आर्थिक व्यवहार जपूनच करावे. आरोग्याची काळजी घ्या. महाग्रह शनीचे राश्यांतर होणार असून,तो आपणास अर्थलाभ करून देणारा ठरू शकतो.

तूळ रास : कुटुंबात गैरसमज टाळावेत 

प्राप्त ग्रहस्थिती पाहता या आठवड्याची सुरवात फारच उत्तम राहणार असली तरी मध्यात त्रास अनुभव येऊ शकतात. संतती कडून काही धक्कादायक बातम्या कळू शकतात. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. आपली आर्थिक कोंडी होऊ शकते. कोर्टाच्या कामात वेळ, पैसे वाया जात असलेले जाणवेल. १७ तारखेला महाग्रह शनीचे राश्यांतर होणार असून,तो आपणास आरोग्याची काळजी घेण्यास सुचवीत आहे.

वृश्चिक रास: मोठी झेप घेऊ शकाल 

या आठवड्याच्या सुरवातीला कुटुंबातून मित्रमंडळीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. नोकरी व्यवसायात आपण एखादी मोठी झेप घेऊ शकाल, यात शंका नाही. आठवड्याच्या शेवटी मात्र स्थिती काहीशी बदलेल. काहींना नोकरीच्या कामामुळे बाहेर जावे लागेल. व्यवसायात स्पर्धा वाढून धावपळ करावी लागू शकते. या काळात आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. १७ तारखेला महाग्रह शनीचे राश्यांतर होणार असून,तो आपणास विरोधकांचा उपद्रव वाढविणारा ठरू शकतो.

धनु रास : शनीची साडेसाती संपणार 

हा आठवडा आपणास अतिशय सुखदायक ठराव. मात्र तरीही आपली कामे रेंगाळत आहे. आळस अनिच्छा काही काम करू देत नाही आरोग्याच्या काही तक्रारी जाणवतील. आळस झटकून कमाल लागा. येत्या १७ तारखेला महाग्रह शनीचे राश्यांतर होणार असून,तो आपणास साडेसातीतून मुक्त करणारा असून मोठे आर्थिक बळ देणारा ठरू शकेल.

मकर रास : साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु 

सरकारी नोकरीत असणाऱ्यांना हा आठवडा चांगला जावा. त्याचप्रमाणे व्यवसाय करणार्यांना उत्तम लाभ मिळेल. अनपेक्षित बढती, व्यवसायात लाभ, आर्थिक आवक वाढण्याचे योग आहेत. बेरोजगारांचे नोकरी व्यवसायाबाबतचे प्रश्न सुटू शकतील. महिला वर्गाकडून सहकार्य मिळेल. महाग्रह शनीचे राश्यांतर होणार असून,तो आपणास काहीसा खर्चवृद्धी करणारा ठरू शकतो.

कुंभ रास : संततीकडून शुभवार्ता कळतील 

या आठवड्यात आपल्याला संततीकडून काही शुभवार्ता कळू शकतात किंवा मुलांच्या संदर्भात काही शुभ घटनाक्रम घडू शकतो. नोकरी , व्यवसाय, विवाह या अनुशंगाने काही हालचाली अवश्य घडतील . आठ्वडाअखेर आपल्याला आरोग्याच्या काही कुरबुरी निर्माण होऊ शकतात. तसेच कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतात. १७ तारखेला महाग्रह शनीचे राश्यांतर होणार असून,तो आपणास मानसिक चिंता वाढविणारा ठरू शकतो.

मीन रास : शनीची साडेसाती सुरु होणार 

नोकरी करणार्यांना हा आठवडा उत्तम ठरू शकतो. मात्र जबाबदारी वाढवून तो दगदग, चिंतादेखील वाढवू शकतो. काहींना अडलेले पैसे काढण्यासाठी आठवडा मध्यात हालचाल केल्यास लाभ होईल. आठवडाअखेर कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण होईल. जोडीदाराशी एकमत झाल्याने काही कौटुंबिक कामे तडीस नेता येतील. हवामानातील बदल त्रासदायक ठरू शकतो. १७ तारखेला महाग्रह शनीचे राश्यांतर होणार असून, आपणास साडेसाती सुरु होणार आहे त्यासोबतच काही अनर्थकारी घटना घडण्याचा संभव आहे.