---Advertisement---

Sharad Pawar : जळगावात येणार शरद पवार; दोन दिवस सभांचा धडका !

---Advertisement---

जळगाव : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वच पक्षांकडून विविध मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार देखील मागे नाहीय. शरद पवार हे शनिवार, २१ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांचा सभा, बैठका असा कार्यक्रम होणार आहेत.

सकाळी ११ ते एक चाळीसगाव येथे धुळे बायपास रोडवरील विराम लॉन्स येथे जाहीर सभेला ते संबोधन करतील. दुपारी दोन वाजता चाळीसगाव येथुन त्यांचे जामनेरकडे प्रयान होईल.

दुपारी ४.३० वाजता जामनेर येथील बोहरा मंगल कार्यालयात त्यांची जाहीर सभा होईल. संध्याकाळी ६.३० वाजता जामनेर येथुन ते बोदवडकडे प्रयाण करतील. संध्याकाळी सात वाजता बोदवड येथे गांधी चौकात त्यांच जाहीर सभा होईल. त्यानंतर त्यांचा जळगाव येथे मुक्काम होईल.

रविवार, २२ रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांचे चोपडाकडे प्रयाण होईल. सकाळी ११ ते १ दरम्यान चोपडा येथे गोभी जिनिंग मिल, सुंदर गडीरोड येथे जाहीर सभा होईल. दुपारी दोन वाजता चोपडा येथुन ते शिरपूरकडे प्रयान करतील. दुपारी ३.३० ते ५.३० वाजता शिरपूर पाच कंदील विजय स्तंभ येथे ते जाहीर सभेला संबोधन करतील.

संध्याकाळी ६.३० वाजता त्यांचे दोंडाईचा येथे आगमन होईल. सायंकाळी ६.३० वाजता दोंडाईचा येथे निर्मल एंपोरियम जवळ छत्रपती शिवाजी महाराज रोड येथे जाहीर सभा होईल. त्यानंतर त्यांचे धुळ्याकडे प्रयाण होईल.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment