शरद पवारांनी का मागितली अमरावतीकरांची माफी ; जाणून घ्या सविस्तर माहिती

अमरावती : माझ्याकडून एक चूक झाली असून मला अमरावतीकरांची माफी मागायची असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत उमेदवाराला मतदान करा असे आवाहन  काही सभा घेऊन केले होते. लोकांनी माझा संदेश स्वीकारत आम्ही ज्यांना पाठिंबा दिला होता त्यांना खासदार बनविले. आता मात्र आता मी तुमची माफी मागतो असे ते पुढे म्हणाले.

२०१९ च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी शरद पवारांनी सभा घेत नवनीत राणांना मतदान करावे असं आवाहन केलं होतं. मात्र आता ही आपली मोठी चूक होती, असं शरद पवारांनी म्हटले आहे. तसेच पाच वर्षातील त्यांचा अनुभवातून माझ्या मनात अस्वस्थता होती. यासंदर्भात मला नेहमी वाटत होते की अमरावतीला जाऊन आमच्याकडून चूक झाली अशी कबुली द्यावी. आता ती चूक पुन्हा होणार नाही, असा शब्द शरद पवारांनी उपस्थितांना दिला आहे. अमरावतीमध्ये महायुतीकडून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी स्वत: शरद पवार मैदानात उतरलेत. ज्याचं सामाजिक आणि वैयक्तिक जीवन शेवटच्या माणसाचा विचार करणारं आहे अशा बळवंत वानखेडे यांना विजयी करा हे सांगण्यासाठी मी इथे आलोय, असं शरद पवारांनी म्हटलं.