शरद पवारांच्या निर्णयाचे जळगावातही पडसाद

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा माजी मंत्री शरदचंद्र पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे अचानक जाहिर केल्याने कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्या या निर्णयाबाबत तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे त्यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात कमालीची अस्थतता दिसून आली. शरद पवार यांनी हा निर्णय मागे घेण्याची आग्रही मागणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व आमदारांकडून करण्यात आली आहे.  पदाधिकारी व आमदारांनी पवार यांनी निर्णय मागे घेण्याची आग्रही मागणी केली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांमध्ये चलबिच सुरू झाली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनीही थेट राजीमाना देण्याचा इशाराही दिला आहे. तसेच जिल्ह्यातील पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी काम न करण्याचा निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीच्या घोेषणेनंतर आणि पक्षाध्यक्ष पद सोडण्याच्या निर्णयाने राष्ट्रवादीचे राज्यभरासह जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी प्रचंड भावूक झालेले पाहायला मिळाले. राज्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी पवार यांनी पक्षाध्यक्ष पदावर कायम राहण्याचा आग्रह धरला आहे. तसेच राजकीय निवृत्तीची घोेषणा मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतलेला निर्णय मान्य नाही. महाराष्ट्रासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या हिताच्या दृष्टीने आजच्या सामाजिक व राजकीय जीवनात त्यांच्या अनुभवाचा विचार करता त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला व राज्याला गरज आहे. त्यासाठी त्यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या आग्रहास्तव निर्णय मागे घ्यावा.  –  अनिल पाटील, आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेस, अमळनेर

सन १९८० पासून शरदचंद्र  पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात काम करीत आहे. त्यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा.  आम्ही कुणीही काम करणार नाही. सध्याची राजकीय स्थिती पाहता आम्हाला मागदर्शनाची गरज आहे. माजी मंत्री शरदचंद्र पवार यांनी निर्णय मागे घेऊन कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात उमेद निर्माण करावी. जेणेकरून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढेल.   – ऍड.रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी, कंॉग्रेस

 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घ्यावा, अन्यथा सर्व पदाधिकारी आपपल्या पदाचा राजीनामा देतील. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांचा विचार होऊन खासदार पवार यांनी राजकीय सेवानिवृत्ती मागे घ्यावी. राजकारणात पक्षाला खासदार पवार यांच्या   मागदर्शनाची गरज आहे.

– गुलाबराव देवकर , माजी मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेस