Sharadiya Navratri Start 2024 । आजपासून रंगणार नवरात्रोत्सवाचा ज्वर, काय आहेत शारदीय नवरात्रीचे महत्त्व ?

Sharadiya Navratri Start 2024 ।  भाद्रपद पितृपक्ष संपून गुरुवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात होत आहे. नवरात्रौत्सवा अर्थात देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा हिंदू सण. गुरुवारी, ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होईल. नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज झाल्या आहेत. त्यासाठी बाजारात पूजेसाठीचे साहित्य, विविध प्रकारच्या देवीच्या म र्ती, आराससाठीचे सामान, नारळ ओटी भरण्याचे साहित्य, हळद, कुकूं आदी साहित्य बाजारात विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर विक्रीस आणले आहेत.

देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे
आदिमाया किंवा जगदंबा म्हणून नरूपे देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे असून देवीच्या नऊ रूपामध्ये उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही सौम्य तर दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत. तसेच शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदम ाता, कात्यायनी कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत. या सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी, असे नाव मिळाले

नवरात्री निमित्त यात्रोत्सव
शहरातील ईश्वर कॉलनीत सटवाई माता मंदीर खूप जुने असून हे एकमेव मंदिर आहे. तर यावल तालुक्यात आडगाव येथे मनुदेवी मंदिर आणि चाळीसगाव तालुक्यात पाटणा गावाजवळ चंडिका देवीचे मंदिर आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगी गडावर जगदंबेच्या मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त मोठा उत्सव या ठिकाणी असतो.

दांडियाचे युवक, युवतींना प्रशिक्षण
देवीसमोर दांडिया, गरबा ‘खेळण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू झाली आहे. शहरात विविध दुर्गोत्सव मंडळांनी मूर्तीच आरक्षण करून ठेवले आहे. काहींनी ऐनवेळी गर्दी नको म्हणून देवीची मूर्ती मंडळाकडे वाहनांवर नेणे सुरू केले आहे. शहरासह जिल्हाभरात लहान मोठ्या दुर्गोत्सव मंडळामार्फत देवीची स्थापना करण्यात येणार असून गरबा, दांडियासाठी या मंडळाच्या समोरच मैदान देखील तयार करण्यात आले आहेत. या दुर्गोत्सव मंडळांकडून अनेक ठिकाणी दांडिया, गरबा रासही खेळली जाते. त्यासाठीची दांडियाचे प्रशिक्षण युवक, युवतींना काही संस्था देत आहेत.

परिवहन महामंडळातर्फे बससेवा
मनुदेवी, पाटणादेवी व नांदुरी यात्रोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यावल, जळगाव आगारातून बसेस सोडल्या आहेत.

असे आहे शारदीय नवरात्रीचे महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार, वर्षभरात चार वेळा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. त्यानुसार दोन वेळा गुप्त नवरात्री तर एक चैत्र नवरात्री आणि दूसरी शारदीय नवरात्री. या चारही नवरात्रींमध्ये शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. अश्विन मासातील शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्री सुरु होतो. या काळात देवीचे नामस्मरण करणे, उपासना करणे आणि जप करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जातात. असुरी शक्तीचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टींसाठी हा चांगला कालवधी मानला जातो. दरम्यान या काळात महाराष्ट्रातील शक्तिपीठांनाही मोठ्या प्रमाणात भविक भेट देतात.

घटस्थापना तिथी आणि मुहूर्त
अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथी ३ ऑक्टोबर रोजी १२:१८ वाजता प्रारंभ होईल. तर ४ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजून ५८ मिनिटांनी प्रारंभ होईल. उदयतिथीनुसार, यंदा ३ ऑक्टोबर २०२४ पासून शारदीय नवरात्रोत्स प्रारंभ होईल. घटस्थापना मुहूर्त शारदीय नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना मुहूर्त सकाळी ६ वाजून १५ मिनिटे ते ७ वाजून २२ मिनिटांपर्यंत असेल. तर अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ४६ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत राहील. या शुभ मुहूर्तावर तुम्ही घटस्थापना करू शकता.

जुळून येताय हे दुर्मिळ शुभ योग
ज्योतिषानुसार, यंदा शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ३ दुर्मिळ असे शुभ योग जुळून येत आहे. पहिला शुभ योग म्हणजे इंद्र योग दिवसभर राहत दुसऱ्या दिवसी म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजून २४ मिनिटांनी समाप्त दुसरा शुभ योग हस्त नक्षत्राचा असून हा योग दुपारी ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत असेल. यानंतर तिसरा शुभ योग चित्रा नक्षत्राचा जुळून येत आहे.