Jalgaon Shardiya Navratri 2024 : शहरात आदिशक्ती दुर्गा मातेचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवादरम्यान देवी दुर्गेच्या विधिवत पूजनासह गरबा-दांडिया देखील खेळले जातात. गरबा-दांडिया हे मनोरंजनात्मक वाटत असले तरी हा दुर्गेच्या उपासनेचा एक भाग आहे. अशात शहरात अनेक मंडळांतर्फे दांडिया-गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. यात युवक, युवतींच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले आहे. दांडिया-गरबा खेळताना स्पर्धकांचा विशेष पेहराव, दांडियाची गाणी, गरबा नृत्य आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरत आहे. अशात तुम्हालाही गरबा-दांडियाचा आनंद लुटायचा असेल तर जळगावातील या ५ मोठ्या गरबा-दांडिया स्पर्धांना नक्की भेट द्या.
आकर्षक बक्षिसांची रेलचेल
शहरातील अनेक भागात दांडिया-गरबा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील काही आयोजक मंडळं विशेष चर्चेत आहेत. याचं कारण म्हणजे या ठिकाणचे भव्य आयोजन, स्पर्धकांचा पेहराब आणि विशेष म्हणजे स्पर्धेत विजयी स्पर्धकांना मिळणारे मोठे बक्षिसे चर्चेत आहेत. मोठे बक्षीस असलेल्या या स्पर्धेमध्ये स्पर्धकही त्याच तोडीचे सहभागी होत आहे .
या आहेत जळगावातील ५ प्रमुख दांडिया स्पर्धा
जि.एम.फाउंडेशन व आ. राजूमामा भोळे आयोजित दांडिया स्पर्धा. स्थळ – जी.एस ग्राउंड (शिवतीर्थ मैदान), जळगाव.
नवी पेठ मित्र मंडळ आयोजित दांडिया स्पर्धा. स्थळ- खान्देश मिल कॉम्प्लेक्स, जळगाव.
गुजराथी समाज मंडळ आयोजित दांडिया स्पर्धा स्थळ – सेंट्रल मॉल ( खान्देश मिल कॉप्लेक्स), जळगाव
एल.के.फाउंडेशन आयोजित दांडिया स्पर्धा स्थळ – रामदास कॉलनी, आकार जिम समोर, जळगाव.
शिवरत्न प्रतिष्ठान आयोजित दांडिया स्पर्धा. स्थळ – निवृत्ती नगर, आर.एल हॉस्पिटल शेजारी, जळगाव.