Shardiya Navratri 2024: नवरात्रीचा काळ हा आदिशक्ती देवी दुर्गेच्या उपासनेसाठी समर्पित आहे. यावेळी लोक पूजा करून मातेला प्रसन्न करतात. पण काही राशी आहेत, ज्यावर माता दुर्गेचा आशीर्वाद कायम राहतो.
३ ऑक्टोबर २०२४ पासून देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली असून सर्वर्त्र भक्तिमय वातावरण झालेल असून जगदंबेच्या नावाचा जयघोष सुरू आहे. या काळात प्रत्येक घरात दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. माता दुर्गेला ‘शक्तीस्वरूपा’ असेही म्हणतात. नवरात्रीमध्ये दुर्गेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं की, नवरात्रोत्सवात आईभवानी पृथ्वीवर वास करते. दुर्गा मातेची उपासना केल्यानं भक्तांची दु:ख, त्यांच्यावरची संकटं दूर होतात. ज्योतिषशास्त्रातही भगवतीच्या उपासनेचे तपशीलवार वर्णन केलेले आहे. ज्योतिषांच्या मते, काही राशी आहेत ज्या दुर्गा मातेला खूप प्रिय आहेत. त्यामुळे वृषभ,सिंह आणि तूळ राशीच्या लोकांवर मातेचा आशीर्वाद नेहमीच असतो.
वृषभ : ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीचं आराध्य दैवत म्हणजे, माता दुर्गा. म्हणून, वृषभ राशीच्या चिन्हावर देखील मातेचा विशेष आशीर्वाद असतो. अशा परिस्थितीत नवरात्रीच्या काळात वृषभ राशीच्या लोकांनी विधीनुसार पूजा करावी.
सिंह : माता दुर्गा सिंहावर स्वार होऊन येते… म्हणूनच तिला सिंहवाहिनी असंही म्हणतात. हे दुर्देचं एक नाव आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांवर दुर्गेचा आशीर्वाद नेहमी राहतो. आईच्या कृपेनं अशा लोकांची त्यांच्या करिअरमध्ये, व्यावसायात प्रगती होते. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या काळात आदिशक्तीच्या नऊ रूपांची पूजा करणं त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.
तूळ : ज्योतीषी सांगतात की, तूळ राशीच्या लोकांचं आराध्य दैवत शुक्र ग्रह आणि देवी दुर्गा आहे. त्यामुळे दुर्गा मातेची भक्तिभावानं पूजा केल्यास त्याचे फायदे नक्कीच मिळतात. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीची पूजा करावी आणि स्तोत्र-मंत्राचा जप करावा. यामुळे तूळ राशींच्या लोकांची भरभराट होते.