शेअर बाजार: आजच्या व्यवहारात शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये मोठी उसळी आली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 392.81 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या सत्रात 392.19 लाख कोटी रुपये होते. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजाराच्या बाजार भांडवलात 62,000 कोटी रुपयांची झेप घेतली आहे.
आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार लाल रंगात बंद झाला. मात्र, सकाळी बाजार तेजीत सुरू झाला. सेन्सेक्स जवळपास 250 अंकांनी तर निफ्टी 73 अंकांच्या वाढीसह उघडला. मात्र दिवसभराच्या व्यवहारात बाजारात प्रॉफिट बुकींग झाली. त्यामुळे BSE सेन्सेक्स १५ अंकांच्या किंचित घसरणीसह 73,143 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 5 अंकांच्या घसरणीसह 22,212 अंकांवर बंद झाला. सकाळी निफ्टीने पुन्हा 22297 चा उच्चांक गाठला होता .