तीच्या ‌‘एव्हरेस्टवर’ चार ‌‘जम्प’ आणि नावावर झाल्यात अनेक जागतीक विक्रमाच्या नोंदी

डॉ. पंकज पाटील

जळगाव :  समुद्र सपाटीपासून उंच असलेल्या बर्फाळ एव्हरेस्ट पर्वताच्या डोंगर रांगावर स्कायडायव्हिंग करून कवयित्री बहिणाबाई चौधरींची पणती पद्मश्री शीतल महाजन हीने तीचे स्वप्न पूर्ण केलेच पण सोबत तीच्या नावावर अनेक जागतीक विक्रमांच्या नोंदीही झाल्यात. एव्हरेस्ट शिखरावर स्कायडायव्हिग करणारी ती जगातील आणि भारतातील पहिली महिला ठरली आहे.

पहिली उडी 11 नोव्हेंबरला

शीतलच्या या मोहिमेची सुरवात 11 नोव्हेंबरपासून झाली. 11 नोव्हेंबरला तीने हिमालयातील एव्हरेस्ट प्रदेशात एकूण 4 पॅराशूट जम्प केल्यात. तीने  5000 फुटापासून सुरवात करत 17,500 फुट उंचीवरून पहिली पॅराशूट उडी घेतली आणि 12,500  फुटावरील विमानतळावर उतरली. या उडीत न्यूझीलंडमधील दिग्गज वेंडी स्मिथ स्कायडायव्हर हे तीचे प्रशिक्षक विमानात होते.

पहिल्या दिवसाच्या उडीत तीने जगातील तीन ध्रुवांवर स्कायडाइव्ह करणारी जगातील पहिली महिला, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि जगातील तिसरा ध्रुव म्हणजेच माउंट एव्हरेस्ट स्कायडायव्हिंग करणारी जगातील पहिली महिला म्हणून जागतिक रेकॉर्ड केले.

यासोबतच माउंट एव्हरेस्ट समोर स्कायडाइव्ह करणारी पहिली भारतीय नागरी महिला, जगातील तीन ध्रुव, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि जगातील तिसरा ध्रुव म्हणजेच माउंट एव्हरेस्ट या तीन ध्रुवांवर स्कायडायव्ह करणारी पहिली भारतीय महिला म्हणून राष्ट्रीय रेकॉर्ड तीने केला.

दुसरी उडी 12 नोव्हेंबरला

दुसरी उडी 12 नोव्हेंबर 2023 रोजी घेतली. त्यासाठी तीने विमानतळावरून उड्डाण केले. 8000 फुट उंचावरून भारतीय ध्वजासह स्कायडायव्हिंगची उडी दिग्गज कॅमेरावुमन वेंडी स्मिथ आणि रशियातील कॅमेरा वुमन नादिया सोलोव्येवा यांच्यासमवेत घेतली. या उडीत तीने भारतीय राष्ट्रध्वजासह स्कायडायव्हिंग करणारी पहिली महिला म्हणून राष्ट्रीय विक्रम नावावर नोंदवला.

तिसरी उडी 13 नोव्हेंबरला 

तीसरी उडी 23,000 फुटांवरून अमादाब्लम माउंटन बेस कॅम्पवर घेतली.स्कायडायव्हिंग करत ती 4600 मी/15091 फूट उंचीवर उतरली. या उडीमध्ये फ्रान्समधील प्रसिद्ध स्कायडायव्हर पॉल हेन्री डी बेरे हे तीचे   स्कायडायव्हिंग प्रशिक्षक होते.

आणि स्वप्न पूर्ण झाले

माऊंट एव्हरेस्टच्या समोर 21 हजार 500 फुटावर उडी घेवून स्कायडायव्हिंग करण्याचे तीचे स्वप्न 13 नोव्हेंबरला पूर्ण झाले. एव्हरेस्टवरील कालापत्थर या 17444/5317 येथे सर्वोच्च उंचीवर उतरले. या उडीत पॉल हेन्री डी बेरे हे तीचे प्रशिक्षक होते. या उडीत तीने सर्वात उंच स्कायडायव्हिंग लँडिंग करणारी आणि कालापत्थर येथे माउंट एव्हरेस्ट समोर स्कायडायव्ह करणारी पहिली भारतीय महिला म्हणून जागतिक विक्रम नोंदवला.

यांचे मिळाले सहकार्य

शीतलला या मोहिमेसाठी  दिग्गज स्कायडायव्हर प्रशिक्षक  पॉल हेन्री डी बेरे, ओमर अलहेगेलन,वेंडी स्मिथ, नादिया सोलोव्येवा, एक्सप्लोर हिमालयाचे संस्थापक ,स्कायडायव्हर सुमन पांडे, अनुज पांडे, या मोहिमेचे प्रायोजक रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक नीता अंबानी, अनंत अंबानी, गिरीश यांचे सहकार्य मिळाले असल्याचे शीतल सांगते.

 

13 नोव्हेंबर रोजी मी माऊंट एव्हरेस्टच्या समोर 21500 फूट उंचीवरून माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम उडी मारली. या सर्व उडीतून मी अनेक जागतीक व राष्ट्रीय विक्रमांची माझ्या नावावर नोंद केली. एव्हरेस्ट प्रदेशातील अत्यंत पर्वतीय वातावरणात स्कायडायव्हिंग करणे हे एक मोठे आव्हान होते. प्रत्येक उडी आपल्यासोबत अतिरिक्त जोखीम आणते. पण जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर आतापर्यंत केलेल्या सर्वोच्च उंचीवरील उडींपैकी ही एक असल्याचे तीने  ‌‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले. 

शीतल महाजन, अंतरराष्ट्रीय स्कायडाव्हर