Chandrapur Crime: बाजारात गेली अन् परतलीच नाही, वर्गमित्राने केली हत्या

#image_title

चंद्रपूर : चिमूर येथील गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह १० नोव्हेंबर रोजी नागपूर शहराजवळ मृतावस्थेत आढळून आला. अरुणा काकडे (वय ३७) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात पोलीसांनी तपास करत मृत महिलेचा वर्गमित्र नरेश डाहुले याला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

अरुणा काकडे या २६ नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केटमध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र अरुणा काकडे घरी न परतल्याने कुटुंबियांनी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. मिसिंग तक्रार असल्याने नागपूर आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत नरेश डाहुले याला अटक केली आहे.

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतून पोलीस कर्मचारी असलेला नरेश डाहुले हा निलंबित झाला होता. नरेश व अरुणा हे दोघेजण एका वर्गातील मित्र- मैत्रीण होते. अरुणा हि चिमूर येथे देवांश जनरल स्टोअर्स हे दुकान चालवायची. दुकान असल्यामुळे अरुणा हि सामान आणण्यासाठी नेहमी नागपूरला जात असे.

अरुणा काकडे आणि आरोपी नरेश डाहूले लहानपणापासून एकाच शाळेत शिकले होते. दोघे वर्गमित्र होते. २६ तारखेला मृतक अरुणा आणि आरोपी नरेश नागपूरला एकत्र होते. दरम्यान, या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु झाला होता. दोघे नागपूरला गेले असताना दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपीने अरुणा यांचा गळा दाबून हत्या केली.

मृत अरुणा काकडे यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीचा नागपूर आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्तपणे तपास केला. यात निलंबत पोलीस कर्मचारी नरेश डाहुले याने अरुणाचा खून केल्याचे निष्पन्न झाले.आरोपीने तिचा मृतदेह हरिश्चंद्रवेळा येथील निर्जनस्थळी असलेल्या एका घरातील शौचालयाच्या टाकीमध्ये लवपला होता. त्यानंतर निलंबित पोलीस कर्मचारी असलेला आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी कॉल रेकॉर्डच्या मदतीने आरोपीचा शोध घेतपोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आणखी तपास सुरु आहे.