---Advertisement---

Talathi Suicide : पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या, घरच्यांना केले आवाहन, म्हणाला…

by team
---Advertisement---

Talathi Suicide : गेल्या काही दिवसांपासून पतिपत्नीच्या वादातून हत्या झाल्याच्या अनेक घटना एकायला येत आहेत. नुकतीच पुण्यातील तरुणीची बेंगळुरुमध्ये निर्घृणपणे हत्य करण्यात आली. मृतदेहाचे तुकडे करुन पतीने ते सुटकेसमध्ये भरले आणि तिथून फरार झाला. अशा एक ना अनेक घटनांमुळे अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. अशातच तलाठी असलेल्या एका नवऱ्याने बायकोकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिलानंद तेलगोटे यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. शिलानंद तेलगोटे हे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयाच्या अंतर्गत तलाठी म्हणून कार्यरत होते.

शिलानंद तेलगोटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या व्हॉटसॲपवर स्टेटसमधून आत्महत्या करण्यामागच कारण स्पष्ट केलं आहे. शिलानंद तेलगोटे यांनी स्टेटसमध्ये पत्नी आपला मानसिक छळ करत असल्याचे म्हटले आहे. माझ्या मृत्यूनंतर माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू , असेही तेलगोटे यांनी म्हटले आहे. पोलिसांनी शिलानंद तेलगोटे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या पोस्टमार्टेम रिपोर्टवर पोलिसांचा पुढील तपास अवलंबून असेल. दरम्यान, शिलानंद तेलगोटे यांनी आपले मृत्यूपत्रही तयार केले होते. यामध्ये त्यांनी आपली सर्व संपत्ती मुलाच्या नावावर केली आहे.

‘व्हॉट्सअप’वर स्टेटस काय?

मी श्री. शिलानंद माणिकराव तेलगोटे (वय ३९, रा. तेल्हारा, शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा) मी दिनांक ३०/०३/२०२५ रोजी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही जबाबदार असून ती मला माझ्या मुलासमोर अश्लील शिव्या देते, आणि मला वारंवार फाशी घे असं सांगते. माझे पैसे तिचा भाऊ श्री. प्रवीण गायबोलेकडे असून, त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती. सदर रक्कम मी तलाठीकडून काढली असून त्याचं व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे. कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे. माझा मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की, माझं पोस्टमार्टम झाल्यानंतर माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये. कारण आज मी पाच दिवस झाले, जेवण केलेलं नाही. माझ्या पत्नीला सोडून कोणीही पाहिलं तरी चालेल… कारण माझी पत्नी…

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment