Shindkheda Assembly Constituency, परेश शहा : शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे आमदार जयकुमार रावल यांनी चौथ्यांदा कमळ फुलवले आहे. या निवडीने त्यांनी मतदारसंघात चार वेळेस निवडण्याचा विक्रम केला आहे. त्यांना प्रचारासाठी मिळालेला वेळ, सूक्ष्म नियोजन, व्यूहरचना ठरली यशस्वी ठरला, असे म्हणता येईल.
गेल्या १५ वर्षात तालुक्यात केलेल्या विकास कामांमुळे त्यांना मतदारांनी पुन्हा संधी दिली. मतदारसंघातील सिंचनाच्या, दळणवळणाच्या या तालुक्यातील बेरोजगारी संपविण्यासाठी औद्योगिक वसाहतीत विविध उद्योग आणून तालुक्यातील बेरोजगारांना काम मिळवून देण्यासाठी सुरू असलेला प्रयत्न दखल घेण्यासारखा आहे.
सुलवाडे जामफळ योजनेसारख्या योजनेतून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणण्याचे केलेले नियोजन, युती शासनाने महिलांसाठीची लाडकी बहीण योजनेचाही फायदा या निवडणुकीत आमदार रावल यांना झाला. प्रचारार्य देशाचे गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री भूपेंद्र यादव, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या सभेतून मतदारसंघात वातावरण तयार करण्यात यशस्वी झाले. धुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचा थोड्या मताने पराभव झाल्याने त्याचे शल्य मतदारांना असल्याने भाजपचे मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानाला बाहेर पडले. त्याचाही फायदा आमदार रावल यांना झाला.
आमदार रावल यांचे पहिल्याच यादीत नाव जाहीर झाल्याने त्यांना मतदारसंघात मतदारांची संपर्क साधण्यासाठी अधिक कालावधी मिळाला. त्यांचे निवडणुकीतील असलेले सूक्ष्म नियोजन, कार्यकर्त्यांची फौज या जोरावर त्यांना मतदारसंघातील व्यूहरचना आखणे सोपे झाले.
मागील तीन निवडणुकीत असलेला दांडगा अनुभव, मतदारसंघात केलेली विविध विकास कामे या जोरावर मतदारांशी संपर्क साधणे सोपे झाले. या निवडणुकीत भाजपसोबत वेगळी संघाची टीमदेखील मैदानात उतरली होती. त्यांनी संपूर्ण म तदारसंघ पिंजून काढून देश वाचवण्यासाठी, हिंदूंचे संरक्षण करणाऱ्या पक्षाला मत देण्याचे आवाहन केले. त्यांनी केलेला शिस्तबद्ध प्रचार हादेखील आमदार रावल यांच्या पथ्यावर पडला.
बेडसे यांना तिसन्यांदाही अपशय
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे संदीप बेडसे यांनी तिसऱ्यांदा आपले नशीब आजमावून पाहिले, परंतु तिसऱ्यांदादेखील त्यांना अपयश आले. त्यांचे अपयश येण्याची प्रमुख कारणे मतदारसंघात संपर्काचा अभाव, पक्षाने उमेदवारी जाहीर करण्यासाठी केलेला उशीर, मतदारसंघातील कुठल्याही विकास कामांसाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न केलेला नाही. महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना मनवण्यात गेलेला वेळ, म हाविकास आघाडीत झालेली बिघाडी तसेच प्रचारादरम्यान कुठलेही नियोजन नसणे विकासकामांसाठी ठोस कार्यक्रम नाही. निवडणुकीत मांडलेती जातीय समीकरणे तसेच शिंदखेडा मतदारसंघात शरदचंद्र पवार यांनी सभा घेतल्यानंतर त्या पक्षाचा उमेदवार पराभव होण्याची परंपरा कायम राहिली. १९९५ पासून मतदारसंघात घेतलेल्या सभेतून आजपावेतो झालेल्या सभेपर्यत सर्वच उमेदवार पराभव झाले आहे.
मतदानाचा वाढलेला टक्का भाजपच्या पथ्यावर
या निवडणुकीत मतदानाचा वाढलेला टक्कादेखील भाजपाच्या पथ्यावर पडला आहे. या निवडणुकीत मुस्लिम मतदार उत्स्फ र्तपणे मतदानाला बाहेर निघालेला दिसून आला नाही. या निवडणुकीत श्याम सनेर यांनी बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी करुन शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात टिकून असताना मतदारसंघात संपर्क असताना ११ हजारांपर्यंतच सनेर यांना मजल मारता आली.
तर महाविकास आघाडीकडे कार्यकर्तही राहणार नाहीत
या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. याबातीत नेत्यांनी ठोस पावले न उचलल्यास भविष्यात महाविकास आघाडी सोबत कार्यकर्तेदेखील राहणार नाही याचादेखील नेत्यांना विचार करणे आवश्यक आहे. भाजपनेदेखील या विजयाने होरपळून न जाता म तदारसंघातील प्रलंबित असलेल्या योजना पूर्ण करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याने मतदारसंघाचा विकासासाठी म ोठ्या प्रमाणावर निधी आणून मतदारसंघात विकासाची गंगा आणण्याचे मोठे आव्हानदेखील भाजपावर राहणार आहे