---Advertisement---

तीर्थक्षेत्र देहू हादरले! संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराजांनी उचलले टोकाचे पाऊल

---Advertisement---

पुणे : तीर्थक्षेत्र देहू गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हभप शिरीष महाराज मोरे (30) यांनी आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी 8.30 च्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण देहू गावावर शोककळा पसरली असून, त्यांच्या अनुयायांसह संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलीस तपासात आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा : सावधान! सायबर ठगांचा नवा फंडा, बँक बॅलेन्सवर असा घालतात गंडा

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच शिरीष महाराजांचा साखरपुडा पार पडला होता. त्यांच्या विवाह सोहळ्याची तयारी घरात सुरू होती. संपूर्ण कुटुंब आनंदात असताना अचानक घडलेल्या या घटनेने मोरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलीस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, आत्महत्येच्या कारणांचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून शिरीष महाराज यांचा परिवार आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे.

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण वारकरी संप्रदाय शोकमग्न झाला असून, संत तुकाराम महाराजांच्या वंशजाने अशा प्रकारे जीवन संपवल्याने देहू गावासह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment