---Advertisement---

शिरपूर : अवैध गांजा लागवडीचा प्रकार उघड; पोलिसांचा छाप्यात लाखोंचा माल जप्त, आरोपी फरार

by team
---Advertisement---

शिरपूर तालुक्यातील हाडाखेड जवळील आसरापाणी येथे वनजमिनीवर अवैध गांजा लागवडीचा प्रकार उघडकीस आला आहे. सांगवी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण ५१ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. विशेष म्हणजे, आठवडाभरापूर्वीच याच परिसरातून २ कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला होता.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आसरापाणी येथील वनजमिनीत भियासिंग दिलदार पावरा याने गांजाची लागवड केली होती. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी काशीराम देवरे यांच्या पथकाने छापा टाकला असता, त्याच्या शेतातून ११२ किलो सुका गांजा व ८०० किलो गांजाची ओली झाडे जप्त करण्यात आली.

हेही वाचा:  भुसावळ मार्गे धावणाऱ्या गाड्यांच्या मार्गात बदल; झेलम एक्सप्रेस ‘या’ तारखेपर्यंत रद्द

तपासादरम्यान, आसरापाणी शिवारापासून पाच किलोमीटर अंतरावर हाडाखेड गावाच्या हद्दीत दशरथ रिशा पावरा याने अंदाजे एक एकर शेतात गांजाची लागवड केल्याचे आढळले. तेथून १२०० किलो गांजाची झाडे (किंमत २४ लाख रुपये) जप्त करण्यात आली.

पोलिस कारवाईची माहिती मिळताच दोन्ही ठिकाणावरून आरोपी पसार झाले.या  कारवाईत ११ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचा ११२ किलो सुका व ४० लाख रुपये किमतीची गांजाची ओली झाडे याप्रमाणे एकूण ५१ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment