---Advertisement---

Shirpur News : दि शिरपूर मर्चेंट्स बँकेचे चेअरमन अन् व्यवस्थापकांसह ४९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

---Advertisement---

Shirpur News : दि शिरपूर मर्चेटस को ऑपरेटिव्ह बँकेतून घेतलेल्या कर्जाची नियमाप्रमाणे फेड न करता, बँकेचे सभासद व ठेवीदारांचा विश्वासघात करून सुमारे १३ कोटी ७५ लाख ८६ हजार २५३ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात बँकेचे चेअरमन, व्यवस्थापकांसह ४९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सनदी लेखापाल अजय नंदलाल राठी (रा. आदिनाथ निवास, कोतवाल पार्क, टिळकवाडी, नाशिक) यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तीत म्हटले आहे की, ४४ संशयितांनी दि शिरपूर मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेकडून कर्ज घेतले आहे. परंतु या कर्जाची त्यांनी मुदतीत परतफेड केली नाही.

हे कर्ज त्यांनी ज्या व्यवसायासाठी घेतले आहे, त्या व्यवसायासाठी न वापरता दुसरीकडे वळविले आहे. ही प्रकरणे कर्ज प्रकरणे कर्ज विनातारण घेतले होते. मध्यतंरीच्या काळात बँकेच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, यांपैकी अनेक कर्ज प्रकरणे तारण झाली आहेत अथवा कर्जाची फेड झालेली आहे. कर्जाची नियमित फेड न करता बँकेचे सभासद व ठेवीदारांचा विश्वासघात करून सुमारे १३ कोटी ७५ लाख ८६ हजार २५३ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात संशयित इतेश हसमुखलाल जैन, एकनाथ बालकिसन भंडारी, केतनकुमार जयराज जैन, श्रीराम अशोक विठोबा, शांतिलाल दगडूलाल जैन, खुदाबक्ष शेख चाँद तेली, दिलीपकुमार राधेश्याम अग्रवाल, गिरिजा गिरीश भगवान, गिरीश सिद्धनाथ भागवंत, गोविंदलाल मदनलाल अग्रवाल, प्रमोद गजानन धाकड, भगवान बाबूलाल अग्रवाल, शेख खतिब अजीज, जतीन किरण जैन, संगीता अविनाश शाह, सचिन विनेंद्र शाह, शेख कामील अहमद शेख नजीर, सुरेश तुळशीराम अहिरे, अमोल कांतिलाल जैन, भूषण अरुण चौधरी, चंपालाल हिरालाल पटेल, रमेश हिरालाल कमलानी, प्रवीण चंद्रसिंग देशमुख, हर्षद जयराज जैन, रामेश्वर घासीलाल अग्रवाल, जितेंद्र शांताराम गिरासे, रितेश सुरेश जयस्वाल, नितीन लक्ष्मण माळी, भगवान रामकृष्ण दलाल, सुरेशलाल छगनलाल गुजराती, जया किरणचंद जैन, अमरदीप रमेश सिसोदिया, प्रकाश महारू चौधरी, रवींद्र महारू चौधरी, जतीन किरणचंद जैन, दिलीप एकनाथ धाकड, मंगलसिंग कुंदनसिंग जाधव, राजेंद्र नंदलाल अरुजा, सौरव राजेंद्र भंडारी, जयपाल विजयसिंग गिरासे, निखिल अशोक अग्रवाल, निमराज

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment