---Advertisement---

एकनाथ शिंदेंवरील विडंबन गीत भोवले, शिवसैनिकांनी केली स्टुडिओची तोडफोड

by team
---Advertisement---

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबन गीत सादर करणे विनोदी कलाकार कुणाला कामराच्या चांगलेच अंगलट आले आहे. बदनामी केल्याचा ठपका ठेवत कामराविरोधात प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यात आला. या गीतावरून सोमवारी दिवसभर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते.

शिवसेनेचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामराने विडंबन गीत म्हटले. हिंदी गीत ‘दिल तो पागल है’ या गीताच्या चालीवर शिंदे यांच्यावर गद्दार या शब्दाचा वापर करीत टीकेचे बाण सोडले. हे गीत समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी जिथे हे गीत तयार झाले, त्या खार भागातील हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली.

या सर्वांविरोधात प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला असून, शिवसेना कार्यकर्ता राहुल कनालसह अन्य ११ जणांना पोलिसांनी अटक केली. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला.

ज्या हॉटेल युनिकॉन्टीनेंटलमधील स्टुडिओत कामराच्या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले, त्या हॉटेलबाहेर रविवारी रात्री अनेक शिवसैनिक एकत्र आले होते. त्यांनी कथितपणे स्टुडिओ आणि हॉटेल परिसरात तोडफोड केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. व्हिडीओ प्रसार माध्यमांवर आल्यानंतर खार भागातील पदाधिकारी राहुल कनाल यांच्या नेतृत्वात एकत्र आले आणि हॉटेलवर धडक देऊन तोडफोड केली.

कुणाल कामरा कंत्राटी विनोदी कलाकार

कामरा मुद्यावरून राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सोमवारी दिवसभर चकमकी झडत राहिल्या. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी तर कामराने दोन दिवसांत माफी न मागितल्यास त्याला रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा दिला. कामराने वक्तय मागे घेत एकनाथ शिंदे यांची माफी मागावी, अन्यथा त्याने शिवसैनिकांच्या संतापाचा सामना करण्यास तयार राहावे, असा इशारा शिवसेना नेते संजय निरूपम यांनी दिला. दरम्यान, कुणीही कायद्याचा अनादर करता कामा नये. विचारधारा वेगवेगळ्या असू शकतात, पण बोलताना कायद्याची चौकट मोडली जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment