तरुण भारत लाईव्ह । ३ एप्रिल २०२३। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या महिन्यात जळगाव जिल्ह्यात सभा घेणार आहेत. यामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये एकच आनंदाच वातावरण पाहायला मिळत आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच जळगाव जिल्ह्यात सभा घेणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेला शिंदे यांच्या बंडामुळे मोठा फटका बसला आहे. तब्बल पाच आमदार हे शिंदें सोबत गेले आहेत. ज्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे. यामुळे उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यात सभा घेणार असून यावेळी सर्वच बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करणार हे आता नक्की झाले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेची तारीख अजूनही निश्चित झालेली नाही. मात्र मालेगाव नंतरची सभा ही जळगावतच होणार असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. शिवसैनिक केवळ मुंबईहून येणाऱ्या आदेशाची वाट पाहत असून आतापासूनच तयारी लागले आहेत. मात्र एप्रिल महिन्यात ही सभा घेतली जाणार असे म्हटले जात आहे.