तरुण भारत लाईव्ह न्यूज। पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते राहुल नेतलेकर, सोहम विसपुते यांना शिवसेना महानगर समन्वयक पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. राहुल नेतलेकर व सोहम विसपुते यांनी ठाकरे गटातून नुकतेच शिंदे गटात प्रवेश केला आहे.
आज रविवार दि. २ एप्रिल रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते राहुल नेतलेकर, सोहम विसपुते यांना अजिंठा विश्रामगृह येथे शिवसेना महानगर समन्वयक पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी जळगाव महापालिका सभागृह नेते ललित कोल्हे, महिला संपर्क प्रमुख सरिता कोल्हे, महानगर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, संघटक दिलीप पोकळे, युवासेना महानगर प्रमुख हर्षल मावळे, नगरसेवक गजानन देशमुख, आशुतोष पाटील, प्रवीण कोल्हे, उमेश सोनवणे आदी उपस्थित होते.