शिवसेना ठाकरे गटात इनकमिंग ; लकी टेलर, प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी बांधले शिवबंध

मुंबई : लोकसभा निवडणूक जाहीर होताच जळगाव जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर करण्याचे पेव फुटले आहे. माजी खासदार उन्मेष पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिट्ठी देत शिवसेना ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. तर उद्योजक श्रीराम पाटील यांनी भाजपाला राम राम करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. याच धर्तीवर बी.आर एस चे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शनिवार, १३ रोजी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. त्यांच्यासह शिवेसना शिंदे गटाच्या नेत्या प्रा. डॉ. अस्मिता पाटील, जळगाव भाजपच्या नगरसेविका सरिता नेरकर यांच्यासह पाचोरा आणि भडगाव येथील नगरसेवक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवबंध बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे

भारत राष्ट्र समितीचे अर्थात बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी अण्णा टेलर यांना पक्षाचा गमचा देऊन उद्धव ठाकरे यांनी प्रवेश दिला यानंतर भाजपा आणि आता शिंदे गटात असलेल्या प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंध बांधले त्यांच्यासह जळगावच्या भाजपाच्या नगरसेविका सरिता अनंत नेरकर यांनी प्रवेश घेतला.   शिवसेना शिंदे गटाचे मागासवर्गीय सेलचे गुलाबराव कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे विशाल पालवे, शुभम लाड ,वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव येथील मोसिंग राठोड, पाचोरा येथील संदीप सिसोदिया, अनिकेत पाटील, रसूल पिंजारी, भडगाव येथील शब्बीर खान, अब्दुल रहमान, शेख सलीम, राजू शेख, बशीर शेख, मोहन परदेशी, शफिक टेलर, सुवर्णा पाटील, गायत्री पाटील, लासुर येथील अजय रंगराव देवरे, पंकज देवरे, पाचोरा येथील शेख रसूल फिरोज पिंजारी, पिंपळगाव हरेश्वर येथील देविदास महाजन आदींनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

याप्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई, संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी खासदार उन्मेष पाटील, पाचोरा भडगाव मतदार संघातील शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी, सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शहर प्रमुख शरद तायडे, धरणगाव येथील माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, युवा सेना सचिव विराज कावडीया, तालुकाप्रमुख उमेश साहेबराव पाटील आदी नेत्यांची उपस्थिती होती.