जळगाव : बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा तीव्र शब्दात शिवसेना जळगाव महानगरतर्फे निषेध बुधवारी नोंदविण्यात आला.
बदलापूर येथे अत्याचार करणारे आरोपी यांना सरकारने पाठीशी न घालता शिक्षा देण्यात यावी मागणीसाठी शिवसेना जळगाव महानगरतर्फे तीव्र आंदोलन करून निषेध छेडण्यात आले. मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा घटनाबाह्य सरकारच्या राज्यात महिला मुली सुरक्षित नसून त्यांना पंधराशे रुपयाची गरज नसून सुरक्षेची हमी द्या अशी मागणी ही यावेळी करण्यात आली
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, महानगर प्रमुख मनीषा पाटील, गायत्री सोनवणे, अल्पसंख्यांक आघाडी महानगरप्रमुख जाकीर पठाण, युवा सेना विभागीय सचिव विराज कावडिया, जिल्हाप्रमुख पीयूष गांधी, उप महानगर प्रमुख मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, व्यापारी आघाडी महानगरप्रमुख पुनम राजपूत विभाग प्रमुख किरण भावसार युवा सेना महानगरप्रमुख यश सपकाळे, अमोल मोरे, विभाग प्रमुख शोएब खाटीक, सलीम खाटीक, कलीम खान, मोसिन शेख, संतोष बाविस्कर, ईश्वर राजपूत, निलेश ठाकरे, शकील रंगरेज, प्रीतम शिंदे, विजय कोळी, विठ्ठल कोल्हे, गिरीश कोल्हे, निता संगोळे, संगीता गवळी, विमल वाणी, आशा खैरनार, नीलू इंगळे, जया घोष, विजया पाटील कोकिळा नाथ आदींसह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.