पाचोऱ्यात स्मार्ट मीटरच्या विरोधात शिवसेनेचा महावितरणवर धडक मोर्चा

---Advertisement---

पाचोरा : पाचोरा व भडगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात महावितरण कंपनीच्या ठेकेदारांकडून ग्राहकांच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने स्मार्ट (प्रीपेड/पोस्टपेड) मीटर बसवले जात असल्याच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने महावितरण कंपनीविरोधात धडक मोर्चा गुरुवारी काढण्यात आला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शिवसैनिकांनी ठेकेदारांच्या मनमानी कारभाराचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठेकेदारांकडून गोरगरीब व सर्वसामान्यांच्या घरी विनापरवानगी मीटर बदलले जात असून, विचारणा केल्यास ठोस उत्तर दिले जात नाही. यामुळे परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत असे आदेश दिलेले असताना, हे आदेश धाब्यावर बसवून ठेकेदार मनमानी करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधानसभेत जबरदस्तीच्या मीटर बदलाला विरोध दर्शवला होता.

ठेकेदारांवर महसूलवाढीचा आरोप


ठेकेदार आपल्या आर्थिक फायद्यासाठी सरसकट स्मार्ट मीटर लावत असल्याचा आरोप करताना शिवसेनेने असा सवाल केला की, “हा सर्व प्रकार महसूल वाढवण्याचा डाव आहे का?” हे धोरण तातडीने थांबवले नाही, तर ‘शिवसेना स्टाईलने’ आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या मोर्चादरम्यान महावितरणला निवेदन देण्यात आले. यावेळी शहरप्रमुख सुमित सावंत, बंडू सोनार, अन्वर शेख, गोपाल भोई, भारत राजेश, भैरू अमन, किसन झनझोटे, पंकज गोसावी, शेरू शेख, करण कंडारी, रोहन पवार, तसूद शेख, दीपक मिस्तरी, अल्ताफ खान, संदीप पाटील, विजू भोई, आली, दीपक पाटील, नितीन पाटील, संदीप पाटील यांच्यासह शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---