शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या ‘टी’ मार्गाचा प्रश्न लवकरच सुटणार

जळगाव: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व जळगाव महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीत शिवाजी नगर उड्डाणपुलावरील रस्त्याची, टी आकाराचा व डी मार्ट जवळील रस्त्यांबाबत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली.

बैठकीत ईच्छादेवी ते डी मार्ट दरम्यानचा नॅशनल हायवे विभागाकडे असलेल्या रस्त्यावर चर्चा होऊन शहरातील शिवाजी नगर उड्डाणपुलावरील रस्ते व टी आकाराचे काम केव्हा मार्गी लागेल? असा प्रश्न आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी उपस्थित केला. यावर शिवाजी नगर पुलापासून ते साळुंखे चौक पर्यंतच्या आर्मसाठी मार्किंग येत्या दोन तीन दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागतर्फे करण्यात येणार आहे. ते मार्किंग झाल्यानंतर महानगर पालिकेकडून त्याठिकाणी असलेले अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. या नंतर पुलाच्या या कामाला सुरुवात होणार असल्याचे सा.बा.विभागामार्फत सांगण्यात आले. यावेळी प्रभारी शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, अभियंता प्रशांत सोनवणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी चंद्रकांत सिन्हा उपस्थित होते.