---Advertisement---

धक्कादायक! माहिम परिसरात २९ वर्षीय तरुणाची हत्या

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ । मुंबईतील माहिम परिसरात २९ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडीस आली, यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. तरुणावर नेमका हल्ला कोणी केला, हे अद्याप उघड होऊ शकलेले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे. तरुणाचा मृतदेह आढळलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तरुणाच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

आकाश संजय भालेराव (वय २९, रा. धारावी ) असे मयत तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. सूत्रानुसार, माहीम परिसरात एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याची माहिती शुक्रवारी सकाळी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्या जखमी तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला.

धारदार शस्त्राच्या हल्ल्यामुळे तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. त्याला पोलिसांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र तेथे उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

दरम्यन, तरुणावर हल्ला कोणी केला तसेच हल्ला करण्यामागील नेमके कारण काय असू शकेल, याचे धागेदोरे पोलिसांकडून शोधले जात आहे. घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. सध्या पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment