तरुण भारत लाईव्ह । २० मार्च २०२३। जळगावमधुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या ५ वर्षीय चिमुकलीचा विजेच्या तारेचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. धनवी महेंद्र बाविस्कर असे मृत चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रानुसार, जळगावातील निमखेडी गावातील दत्त मंदिराजवळ सोमवारी सकाळी साडे अकरा च्या सुमारास धनवई ही गल्लीतील काही मुला- मुलींसह घरासमोर खेळत होती. जवळच ट्रॅकटर उभे होते ती ट्रॅकटरवर खेळत असताना तिचा वादळामुळे लोमकळलेल्या वीजवाहक तारेला स्पर्श झाला आणि क्षणीच तिला विजेचा मोठा धक्का बसला आणि जागीच तिचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून बाविस्कर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.