तरुण भारत लाईव्ह । २ जानेवारी २०२२ । अल्पवयीन १७ वर्षीय तरुणीशी ६० वर्षीय वृद्धाने विवाह केला. धक्कादायक म्हणजे, त्यातून अल्पवयीन पीडित सहा महिन्यांची गर्भवती राहिली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पतीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना भुसावळात घडली असून या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.
शहरातील एका भागात रहिवासी असलेल्या १७ वर्षीय तरुणीशी संशयीत अमजद कुरेशी याने फेब्रुवारी 2022 रोजी विवाह केला. त्यातून अल्पवयीन पीडिता सहा महिन्यांची गर्भवती राहिली. याबाबत जळगावच्या बालकल्याण समितीकडे तक्रार करण्यात आली. या पीडितेस बालकल्याण समितीने ताब्यात घेऊन जबाब घेतला. त्यानुसार बाजारपेठ पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी कागदपत्र वर्ग करण्यात आले.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय हरीश भोये, योगेश महाजन हे करीत आहेत. दरम्यान, पिडीतेला सासरच्या लोकांनी शारीरीक त्रास देत मानसिक छळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.