धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यातील चार मुलींसह पळविले विवाहितेला

जळगाव : जिल्ह्यातील चार मुलींसह एका विवाहितेला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात जळगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत दोन मुली, रामानंदनगर पोलीस ठाणे एक, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाणे एक मुलगी तर पहूर पोलीस ठाणे हद्दीतील एका विवाहितेचा समावेश आहे.

जळगाव एमआयडीसी हद्दीत शहरात १५ वर्षीय मुलगी कुटुंबात राहत होती. गुरुवार, ८ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास तिला कोणीतरी फुस लावून पळवून नेले. मिसिंगचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे करीत आहेत. याच पोलीस ठाण्याच्या शहर हद्दीतून १७ वर्षीय मुलीला शुक्रवार, ९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून फुस लावून पळवून नेले. मिसिंगचा तपास उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहेत.

रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतरा वर्षीय मुलीला शुक्रवार, ९ रोजी सकाळी ११ वाजता घरासमोरील तरुणाने पळवून नेले या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहेत.

पहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी २३ वर्षीय विवाहितेला शुक्रवार, ९ रोजी दुपारी एक वाजता राहत्या घरातून तिच्या अज्ञात नातेवाईकांनी पळवून नेले. या प्रकरणी पतीच्या तक्रारीनुसार पहुर

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हवालदार विलास चव्हाण हे करीत आहेत.

चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सतरा वर्षीय मुलीला बुधवार, ७ रोजी दोन वाजेच्या सुमारास कोणीतरी फुस लावून पळवून नेले. मिसिंगचा तपास उपनिरीक्षक कुणाल चव्हाण हे करीत आहेत