यावल : आदिवासी भागातील लोक हे मागासलेले असतात त्यांच्या मागासले पणाचा फायदा घेत. अनेकवेळा फसवणूक केली जाते.हे आता सर्वांनाच माहित आहे, वैद्यकीय पदवी नसताना हे बनावटी व बोगस डॉक्टर निरागस लोकांच्या जिवाशी खेळतात. अशीच एक घटना समोर आली आहे.
यावल तालुक्यातील कोरपावली या गावात बोगस डॉक्टरच्या चुकीमुळे एक महिलेचा जीव गेल्याचे समोर आले आहे. यावल तालुक्यातील कोरपावली येथे बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे ४० वर्षीय आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर गावातून डॉक्टर पसार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरपवाली गावात तीन चार वर्षांपासून विद्युत राय या बंगाली बोगस डॉक्टरने आपला दवाखाना उघडला होता.या बनावटी डॉक्टरविरुद्ध अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. तरीही या डॉक्टरचा दवाखाना हा सुरूच होता.
या बोगस डॉक्टर कडून उपचार सुरु असताना महिलेस चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिले गेले असल्याने तिच्या पायावर विपरीत परिणाम झाले. तिला याचा खूप त्रास होऊ लागला. दरम्यान, मोठी चुक झाल्याचे लक्षात आल्याने या बनावटी डॉक्टरने काही दिवसांन आधीच पळ काढल्याचे समोर आले आहे. या आदिवासी महिलेचा आज मृत्यू झाला. या प्रकारामुळे जळगाव जिल्ह्यातील बोगस डॉक्टारांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.