---Advertisement---

स्मशानभूमीत राख व अस्थी चोरीचा धक्कादायक प्रकार; मृताच्या दागिन्यांवर डोळा असल्याचा अंदाज!

---Advertisement---

जळगाव : चाळीसगाव येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहाची राख व अस्थी चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृताचे नातेवाईक अस्थी जमा करण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले असता, ही घटना समोर आली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव येथील स्मशानभूमीत काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर मृताचे नातेवाईक अस्थी संकलनासाठी स्मशानभूमीत गेले असता, राख व अस्थी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

हेही वाचा : Extramarital Affairs News : दारु पाजली अन् नवऱ्याच्या छातीवर बसली; असे फुटले बिंग!

या घटनेवर चाळीसगावचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा नियोजन बैठकीत तीव्र चिंता व्यक्त केली. जिल्ह्यात अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नमूद करत त्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

हेही वाचा : OYO रुम बुक करून जोडपं करायचं ‘हे’ कांड, पाहून पोलिसही चक्रावले!

मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे अज्ञात चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, स्मशानभूमीमध्ये सुरक्षा वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

पोलीस तपास सुरू

सदर प्रकरणात पोलीस विविध अंगांनी तपास करत असून, मृतदेहावरील दागिन्यांवर डोळा ठेवूनच चोरी झाल्याचा संशय आहे. स्मशानभूमीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच स्थानिकांचा जबाब घेतला जात आहे.

ही घटना मृतांच्या नातेवाईकांसाठी अत्यंत वेदनादायक असून, प्रशासनाने या प्रकरणावर तातडीने उपाययोजना करावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment