धुळे : शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेकडे शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केली. याप्रकरणी शिक्षकावर देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्रानुसार, चाळीसागाव रोडवरील हजार खोली परिसरात राहणार्या 43 वर्षीय मुख्याध्यापिका या देवपूरातील प्राथमिक शाळेत कार्यरत असून शाळेतील शिक्षक अन्सारी अबुजर मक्सुद अहमद (रा. कबीर गंज, वडजाई रोड,धुळे) याने त्यांच्याकडे वारंवार मागे लागून शरीरसुखाची मागणी करून धमकी दिली.
तसेच कारण नसताना मुख्याध्यापिकेच्या पतीला शिवीगाळ करीत धमकी दिली. या प्रकरणी मुख्याध्यापिकेने देवपूर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार शिक्षक अन्सारीवर विविध कामांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक आर.एन. जाधव या करीत आहेत.