धक्कादायक: बापाने केला दोन अल्पवयीन मुलांवर अत्याचार

दिल्ली : लहान मुलांवरती अत्याचार हे दिवसेनदिवस वाढतच आहे. अश्यातच एक बातमी समोरआली आहे, दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलांवर सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केल्याची  धक्कादायक घटना समोर आली आहे.आरोपी हा एका हॉटेलमध्ये काम करतो. आरोपी पित्याने मुलाची आई घरी नसताना अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो कायदा, प्राणघातक हल्ला आणि अनैसर्गिक गुन्ह्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीने एका वर्षभरापूर्वी मुलाच्या आईशी विवाह केला होता. जेव्हा लहान मुलाने विरोध केला. तेव्हा आरोपीने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. महिलेने तिच्या तक्रारीत खुलासा केला आहे की, आरोपी हा तिचा दुसरा नवरा असून दोन्ही मुले पहिल्या पतीची आहेत. तिचा सध्याचा नवरा तिच्या मुलांशी अयोग्य वर्तन करायचा, त्यात मुलांचे कपडे काढायचा आणि वारंवार अश्लील कृत्ये करायचा, असा आरोप महिलेने केला आहे.

मुलाने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्याची आई कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी करते. आई कामासाठी बाहेर असताना सावत्र वडिल त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतात. तसेच शिवीगाळ देखील करतात.

पोलिस उपायुक्त रोहित मीणा म्हणाले, “आम्ही मुलांच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आणि मुलाच्या जबाबाच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. आम्हाला आढळले की त्याच्यावर आणखी एक पॉक्सो कायद्याचा गुन्हा आहे. आम्ही तपास करत आहोत. कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.” !