कासोदा: महिलांवरती होणारे अत्याचार हे वाढतच जात आहे. यातच एरंडोल तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक महिलेसोबत अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राहूल भिल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला ही एरंडोल तालुक्यातील एका गावात आपल्या पतीसह राहते. ती दोघे मासेमारीचे काम करतात ३ सप्टेंबर रोजी पिडीत महिला ही आपल्या पतीसह हनूमंतखेडा शिवारातील शेताजवळ मासे पकडण्यासाठी गेली होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास तिचा पती नसताना आरोपी राहूल विष्णू भिल हा तिथे आला तेव्हा
त्याने अश्लिल वर्तन करत तिचा विनयभंग केला. व तिथून निघून गेला. परत थोड्यावेळाने महिला बसलेल्या ठिकाणी हातात कोयता घेवून आला. तिला व तिच्या पतीला कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून पसार झाला.त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी राहूल भिल याच्या विरोधात कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा