धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींवर वक्फचा दावा

#image_title

तिरुवनंतपुरम : केरळ मधील वायनाड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे म्हटले जाते . त्याच बालेकिल्यात आता वक्फ बोर्डाचे वर्चस्व बघायला मिळते आहे. वायनाड जिल्ह्यातील तळपुझा या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींवर आता वक्फ बोर्डाने बोट ठेवले आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये एकूणच भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेली अनेक वर्ष ज्या जमिनींवर कुटुंबीयांचा उदर्निर्वह होत होता, आज अचानक ती जमीन वक्फ बोर्डाची कशी झाली असा प्रश्न जमीनीच्या मालकांना पडला आहे. जमिनींची सगळी कागद पत्रं, सगळे दाखले असताना सुद्धा ही जमीन वक्फ बोर्डाच्या ताब्यात जाणार असल्याने एकूणच चिंतेचं वातावरण पसरले आहे. सध्या तरी ज्या जमिनींवर दावा केला गेला आहे त्या जमिनी वर ७ घरं असून १० दुकानेही आहेत. पण हळू हळू हे लोण सगळीकडे पसरेल आणि सबंध गावावरच वक्फ बोर्ड दावा करेल अशी भिती गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या उपजिवीकेवर गदा येईल की काय अशी भिती गावातल्या लोकांनी व्यक्त केली आहे. जमीनमालक त्यांच्या दाव्यांवर ठाम आहेत. थाविन्हल पंचायतीच्या रेकॉर्डवरून असे दिसून येते की वादग्रस्त जमिनीवरील किमान एका इमारतीचे कागदपत्र १९४८ च्या पूर्वीचे आहेत.

नाव्या हरीदास यांनी घेतली धाव!

सदर वादाची दखल भाजपच्या नेत्या नाव्या हरिदास यांनी सुद्धा घेतली आहे. त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत कुटुंबीयांना आधार दिला. वक्फ बोर्डाला खाजगी जमीन ताब्यात घेण्यापासून रोखण्याचा निर्धार त्यांनी केला. वक्फ कायद्यात प्रस्तावित सुधारणांपूर्वी जमीन संपादित करण्यासाठी बोर्ड घाईघाईने नोटीस बजावत असल्याचा आरोप भाजपच्या लोकांनी केला आहे. दरम्यान, तिथल्या स्थानिकांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि मंत्री ओआर केलू यांना निवेदन सादर करत कृती परिषद स्थापन केली आहे. आपल्या मालमत्तेचे हक्क सुरक्षित करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी इथले रहिवासी करत आहेत.